उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात महापालिकेच्या मालमत्तांचे विद्रुपीकरण; खर्च वसुलीचा दिला इशारा

रमाकांत घोडराज

धुळे ः दुकानांसह शहरात विविध ठिकाणी बॅनर, फ्लेक्स व इतर विविध स्वरूपात फलक लावले जातात. त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांनी रीतसर महापालिकेला शुल्क अदा करावे. अन्यथा, महापालिकेकडून कारवाईसह खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिला. 

वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर 


धुळे शहरात अनेक टिव्ही शोरुम, मोबाईल शोरूम, जेन्टस व लेडिज गारमेंट्स व विविध दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिक ठिकठिकाणी तसेच दुकानांवर मोठे बॅनर, प्लेक्स लावतात. त्यात विद्युत रोषणाईच्या करतात. तसेच काही नागरिक धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस व इतर प्रकारचे बॅनर लावत असतात. त्यासाठी महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून परवानगी घेण्यात येत नाही. ही बाब महानगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन करणारी व मालमत्ता विद्रुपीकरणअंतर्गत शहरास हानिकारक व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारी आहे.

त्यामुळे दहा दिवसाच्या आत असले प्रकार नियमानुकूल न केल्यास कुठलीही सूचना न देता बॅनर, फलक, फ्लेक्स काढण्याची कार्यवाही केली जाईल व यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा आयुक्त शेख यांनी दिला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM VBRY: तुमच्या खात्यात १५,००० रुपये आले का? आज लाखो जणांना मिळणार थेट लाभ; आधी पात्रता तपासा...

Koyna Dam Security : राज्याला 2 हजार मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाला धोका? दिल्लीहून 'आयबी'चे पथक थेट पोफळीत दाखल, तीन दिवस धरणाची होणार कसून पाहणी

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Satara Politics: उदयनराजेंचा शशिकांत शिंदेंना कानमंत्र, मतदान केंद्रावरील भेटीची साताऱ्यात दिवसभर चर्चा, कानात नेमकं काय सांगितलं?

Life-Saving Injection 9 Crore Case: अनिकाच्या उपचारांसाठी ९ कोटींच्या इंजेक्शनची गरज, हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे; 'चिमुकली लाडकी बहीण नाही का?'

SCROLL FOR NEXT