Muslim Brothers pray for rain
Muslim Brothers pray for rain 
उत्तर महाराष्ट्र

नमाजपठणासह दुवा मागून मुस्लिम बांधवांचे पावसाला साकडे

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी जैताणे (ता.साक्री) येथील खुडाणे चौफुलीवरील ईदगाह मैदानावर नुकतेच नमाजपठणासह काही हिंदू बांधवांसह दुवाही मागितली. गेल्या अडीच महिन्यांपासून माळमाथा परिसरात पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाला हे साकडे घालण्यात आले.

माळमाथा परिसरातील शेतकरी संकटात सापडला असून शेतातील पिके करपू लागली आहेत. गुरा-ढोरांच्याही चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी खोलवर गेली असून पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून यावेळी विशेष नमाजपठण करून दुवाही मागण्यात आली.

मौलाना मोहम्मद रजा यांनी नमाजपठण केले. मौलाना रिजवान यांनी दुवा मागितली. यावेळी मौलाना मुबिन, मौलाना उमेर, मौलाना सादिक, ताहीरबेग मिर्झा, अलताफ कुरेशी, अबरार शेख, इंजि. मोहन सूर्यवंशी, अशोक मुजगे, मुश्ताक शाह आदींसह हिंदू-मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT