nashik mahapalika.jpg
nashik mahapalika.jpg 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या महापौरपदासाठीचे नाव भाजपमध्ये अनिश्‍चित.. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या 16 व्या महापौर निवडण्यासाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असताना बहुमत असलेल्या भाजपकडून उमेदवार निश्‍चित होत नसल्याने नगरसेवकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. भाजपने महापौरपदासाठी उमेदवार निश्‍चित केल्यास सध्या निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या परिस्थितीवर मात करता येणे शक्‍य असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. 

महापालिकेत सत्तांतर होण्याची दाट शक्‍यता

महापालिकेत भाजपकडे बहुमत असले तरी राज्यातील बदलत्या राजकारणामुळे महापालिकेत सत्तांतर होण्याची दाट शक्‍यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या नगरसेवकांना सहलीसाठी रवाना करण्यात आले. त्यातही तब्बल 17 नगरसेवक नाशिकमध्ये आहेत. त्यातील 13 नगरसेवक माजी आमदार बाळासाहेब सानपसमर्थक असल्याने त्यांच्याकडून शिवसेनेला मदत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून महापौरपदाचा उमेदवार जाहीर होत नसल्याने अडचणीत अधिकच भर पडत आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांच्याकडून बदलत्या राजकीय परिस्थितीवर मात करता येणे शक्‍य असल्याचे मत नगरसेवकांकडून व्यक्त केले जात आहे. अशा निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीत वरिष्ठांकडून नाव घोषित केले जात नाही. प्रदेश पातळीवरून महापौरपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT