Liquor stock caught by the police and Police Inspector Narendra Sable & team esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : तीनटेंबा येथील शेतात मद्यसाठा पकडला! 3 लाख 18 हजारांचा मुद्देमाल हस्तगत; नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा

Crime News : तीन लाख १८ हजारांच्या मुद्देमालासह तीन संशयितांना ताब्यात घेऊन नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) दुपारी साडेबाराच्या सुमारास आमलीफळीच्या तीनटेंबा (ता. नवापूर) येथील शेतात लपवून ठेवलेला अवैध मद्यसाठा पकडला. तीन लाख १८ हजारांच्या मुद्देमालासह तीन संशयितांना ताब्यात घेऊन नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nandurbar Crime Liquor stock caught in Tintemba)

नवापूर पोलिसांना गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील आमलीफळी व तीनटेंबा येथे हरीश मावची याच्या शेतातील झोपडीत अवैधरीत्या ठेवलेला देशी दारूचा साठा गुजरातमध्ये विक्रीकरिता घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.

नवापूर पोलिस पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास छापा टाकून पाहणी केली. यात दोन मोटारसायकलींसह मेहुल राकेश नायका (रा. तीनटेंबा, ता. नवापूर), अतुल मुंगा गामित (रा. पटेल फळिया, उच्छल, गुजरात) हे संशयित मिळून आले. त्यांना विचारपूस करून शेतातील झोपडीची झडती घेतली असता झोपडीत देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले. (latest marathi news)

या बॉक्सबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुद्देमाल आम्ही दोघे व आकाश मावची (रा. आमलीफळी, तीनतेंबा, ता नवापूर) व सुरेंद्र ऊर्फ सुंदर यांनी मिळून आणला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार नवापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तीन लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, भाऊसाहेब लांडगे, हवालदार दादाभाई वाघ, दिनेश वसुले, पोलिस नाईक प्रेमचंद जाधव, पोलिस रणजित महाले, किशोर वळवी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT