Police Inspector Rajan More and staff of Mhasavad Police Station along with seized liquor and vehicle. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : चिखली फाटा येथे नाकाबंदीत दारूसह वाहन जप्त; म्हसावद पोलिसांच्या कारवाईत साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत

Crime News : सोमवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत चालकाविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

शहादा : गुप्त माहितीच्या आधारे म्हसावद पोलिसांनी चिखली फाटा येथे लावलेल्या नाकाबंदीत पांढऱ्या रंगाच्या बोरेलो गाडीसह त्यात भरलेली देशी दारू असा पाच लाख ३८ हजार ७३६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत चालकाविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Nandurbar Crime Vehicle seized with liquor in blockade at Chikhli Phata In Mhaswad)

म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशाने व जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाने रविवारी (ता. २८) च्या रात्री अकरा ते सोमवारी (ता. २९) पहाटे पाचदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र ऑलआउट स्कीम राबविण्यात आली.

त्या अनुषंगाने चिखली फाटा येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्र बोलेरो (एमएच ०४, जीएम ५३९७)मध्ये चालक वंशा जंगल्या नाईक (वय ३६, रा. घाटली, ता. धडगाव) आपल्या ताब्यातील वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे अशी गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद पोलिस ठाण्याचे प्रभारी राजन मोरे यांना कळवून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. (Latest Marathi News)

नाकाबंदीच्या ठिकाणी दोन टीममध्ये सापळा रचण्यात आला. रात्री पाऊणच्या सुमारास वाहनचालक बोलेरो गाडीत एक लाख ३८ हजार ७३६ रुपये किमतीच्या देशी दारूचे ५६ बॉक्स व पाच लाख ३८ हजार ७३६ रुपये किमतीच्या बोलेरो वाहनसह मिळून आला.

या वेळी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार भीमसिंग ठाकरे तपास करीत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे, पोलिस नाईक बहादूर बिलाला, शैलेशसिंग राजपूत, पोलिस शिपाई दादाभाई साबळे, उमेश पावरा, अजित गावित, राकेश पावरा, सचिन तावडे यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT