Gelatin Caused Death esakal
उत्तर महाराष्ट्र

Nadurbar Crime: जिलेटीन कांडीच्या स्फोटात महिलेचा मृत्यू; शेतीच्या हिस्सेवाटणीवरून मारण्याचा कट; संशयितावर 5 महिन्यांनंतर गुन्हा

Crime News : या प्रकरणी पाच महिन्यांनंतर मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nadurbar Crime : शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून पुतण्याने आपल्याच काकाला ठार करण्यासाठी बोअरवेलच्या स्टार्टरमध्ये जिलेटीनची कांडी इलेक्ट्रिक वायरला लावून रचलेल्या कटात सासऱ्यांऐवजी सुनेचा बळी गेल्याची घटना जानेवारीत पर्डीपाडा (ता. अक्कलकुवा) येथे घडली होती. या प्रकरणी पाच महिन्यांनंतर मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nandurbar Crime Woman dies in gelatin stick explosion)

पोलिसांच्या माहितीनुसार, केवडीचा मुंगल्याचा पर्डीपाडा येथे गुलाबसिंग आरसी वसावे व दिनकर पारसी वसावे या दोघा चुलत भावांमध्ये शेती हिश्शाच्या वाटणीवरून वाद होता. याच रागातून दिनकर वसावे याने काका आरसी रोता वसावे यांना ठार करण्यासाठी कट रचला.

२६ जानेवारीला दिनकर वसावे याने शेतातील खासगी बोअरवेलच्या स्टार्टरमध्ये जिलेटीनची कांडी (स्फोटक) लावून इलेक्ट्रिक वायरला लावली, जेणेकरून स्टार्टरचा स्फोट होऊन गुलाबसिंग वसावे यांचे वडील म्हणजेच दिनकर वसावे याचा काका ठार होईल, अशी योजना आखली. त्यानुसार त्याने जिलेटीन कांडी स्टार्टरलादेखील लावली.

त्यानुसार त्याच दिवशी आरसी वसावे याच्याऐवजी त्यांची सून समकाबाई गुलाबसिंग वसावे (वय ३८) हिने स्टार्टर सुरू केले. स्टार्टर सुरू झाल्यानंतर मोठा स्फोट होऊन समकाबाई वसावे गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत समकाबाई वसावे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयावरून गुलाबसिंग वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दिनकर पारसी वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत. (latest marathi news)

मृतदेहाची विटंबना केल्याने गुन्हा

केवडीच्या मुंगल्याचा पर्डीपाडा येथील समकाबाई गुलाबसिंग वसावे यांचा २६ जानेवारी २०२४ ला मृत्यू झाला. त्यानंतर ३० मेस दुपारी दोनच्या सुमारास गुलाबसिंग आरसी वसावे, दीपक आरसी वसावे व आरसी रोता वसावे या तिघांनी दफनविधी केलेला समकाबाई यांचा मृतदेह पुन्हा उकरून कापडात गुंडाळून बाहेर काढला व तो फत्तेसिंग पारसी वसावे यांच्या घरासमोर ठेवला.

तसेच फत्तेसिंग वसावे यांना शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. याबाबत फत्तेसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून गुलाबसिंग वसावे, दीपक वसावे व आरसी वसावे या तिघांविरोधात मृतदेहाची विटंबना केल्याने मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार संजय मनोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT