Traffic started from Railway Gate Flyover, Chinchpada Incomplete road work in hilly areas.
Traffic started from Railway Gate Flyover, Chinchpada Incomplete road work in hilly areas. ESAKAL
उत्तर महाराष्ट्र

SAKAL IMPACT : नवापूर रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूल काहीअंशी खुला; वाहनचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी (ता. १२) प्रसिद्ध होताच नवापूर रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूल काहीअंशी वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे लावून वाहतूक बंद केलेली होती. मात्र वृत्तानंतर ढिगाऱ्याचा बाजूने आता वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. (Nandurbar Flyover at Nagpur railway crossing partly open)

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने होत आहे. बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. कामच पूर्ण होत नाही. मात्र, शनिवारपासून थोड्या प्रमाणात का होईना उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांना हायसे वाटले.

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी दशकापूर्वी नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर हद्दीतील बेडकी ते जळगाव जिल्ह्यातील फागणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू केले. काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते मुदतीत झाले नाही.

वास्तविक ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावरील काम असताना दिरंगाई कशामुळे होत आहे, हे समजायला मार्ग नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासन याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही. या रस्त्याच्या कामाचे उद्‍घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. (latest marathi news)

डोंगर भागातील काम अपूर्णच

नवापूरचे कोठडा व चिंचपाडा रेल्वेफाटक उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल. मात्र, चिंचपाडाजवळ डोंगराळ भागात अजूनही रस्त्याचे काम बंद पडले आहे. महामार्ग व उड्डाणपुलाला जोडणाऱ्या मार्गात काही भाग डोंगराचा आहे. डोंगर फोडून मुरूम वाहतूक झाली आहे.

मात्र, रस्ता तयार करण्यात आलेला नाही. हा रस्ता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत चिंचपाडा उड्डाणपूल सुरू होणे शक्य नाही. या दोन्ही रेल्वेफाटकांजवळ वेळ वाया जातो. या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगला उड्डाणपूल लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT