Bawa-Budhya ready for Holi dance.
Bawa-Budhya ready for Holi dance. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Holi Festival : सातपुड्यात होलिकोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

प्रकाश पावरा : सकाळ वृत्तसेवा

धडगाव : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. सातपुड्यात होळीला आदिवासी बांधवांकडून विशेष महत्त्व दिले जाते. राजा फाटा देवगोई माता व देवमोगरा मातेचे मंदिर असलेल्या डाब येथे सातपुडा पर्वतरांगेतील पहिली देवाची होळी गुरुवारी प्रज्वलित केल्यानंतर काठी संस्थानासह बिलगाव मांडवी, धडगाव, आमला, राडिकलमसह आदी राजवाडी होळीला रविवारपासून सुरवात होणार असल्याने सातपुड्यात उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे.

सातपुड्यातील होळी पारंपरिक नृत्य करत पेटविली जाते. प्रत्येक गावाची होळी नियोजित तारखेनुसार होणार असल्याने गावपातळीवर नियोजन आखले जात आहे. प्रत्येक गावाच्या होळीत आजूबाजूच्या गावातील ढोल, बावा बुध्या दाखल होऊन त्याची स्पर्धा भरविली जाते. ढोलावर थाप पडताच परंपरेनुसार महिला-पुरुष, तरुणमंडळी नृत्याचा फेर धरतील.

रात्रभर नाच-गाणे सादर करत वर्षभरातील दुःख, असंख्य संकटांवर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे. आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचित आहे. या होलिकोत्सवाची तयारी १५ दिवस आधीच सुरू होते. मोठा ढोल, बासरी, शस्त्र, घुंगरी, मोरपिसांचा टोप असा साज परिधान करून अंगावर नक्षीकाम करत आदिवासी बांधव होळी साजरी करतात.

रात्रभर रंगतोय उत्सवाचा रंग

संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रति असलेला आदरभाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे. (latest marathi news)

होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वांत महत्त्वाचा सण. होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष-महिला असा भेदाभेद नाही. गरीब-श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. मानवी संस्कृतीची मूल्ये जपणारी ही होळी म्हणूनच या आदिवासी समूहांच्या जीवनात महत्त्वाची आहे.

ऐतिहासिक काठी राजवाडी होळी

शेकडो वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील राज संस्थानाची ओळख असलेली अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी रविवारी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. राजवाडी होळीला सुमारे ७७६ वर्षांची परंपरा असून, ग्रामस्थ व संस्थानांच्या वारसदारांनी ही परंपरा टिकून ठेवली आहे.

या होळीसाठी लागणारा सुमारे ७० फुटांपेक्षाही अधिक लांबीचा दांडा (बांबू) भाविक ग्रामस्थ गुजरातमधून पायपीट करीत आणत असतात. दांडा आणण्याचा हा प्रवास ७७६ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. अनादी काळात आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजापांठा व गांडा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते.

सुमारे १२४६ पासून काठी संस्थानचे पहिले राजे उमेदसिंह सरकार यांनी या होलिकोत्सवाला राजवाडी होलिकोत्सव म्हणून प्रारंभ केला. ती परंपरा आजही काठीचे ग्रामस्थ व वारसदारांकडून जोपासली जात आहे. ७० फुटांपेक्षाही जास्त लांबीचा दांडा गुजरातमधून होळीच्या दिवशी पायपीट करीत आणला जातो. होळीचा दांडा आणल्यानंतर सर्वप्रथम राजघराण्यातील सदस्य त्याची विधिवत पूजाअर्चा करतात.

हा पवित्र दांडा कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर न करता हाताने खणलेल्या खड्ड्यात गाडला जातो. त्याला गूळ, हार, कंगण, डाळ्या, खजूर आदी पदार्थांचे नैवेद्य दाखविले जाते. भाविक ढोल-ताशांच्या गजरात रात्रभर बेधुंद होऊन नाचत असतात. पहाटे सुमारे पाचच्या सुमारास होळी मातेला प्रज्वलित केली जाते. होळी मातेने पेट घेताच मोरवीबाबा, बुध्या, धानका, दोडे आदी हे सर्व जण रामढोलच्या तालावर फेर धरतात.

"सुमारे १२४६ पासून सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा अविरतपणे सुरू असलेला होळी हा महत्त्वाचा सण आहे. पूर्वजांनी सुरू केलेली सांस्कृतिक परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचा सातपुडावासीयांचा आणि आम्हा वारसदारांचा प्रयत्न आहे. होळीमाता संपूर्ण मानवजातीचे कल्याण कर, मानव जातीवर येणारे संकट दूर कर, अशी मनोभावे पूजाअर्चा होळीमातेला केली जाते. होळीमातादेखील आपल्या भोळ्या भाविकांची ही प्रार्थना पूर्ण करते."-पृथ्वीसिंह पाडवी, वारसदार, काठी संस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT