Villagers giving a statement to Naib Tehsildar Dilip Kulkarni. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : सीमा तपासणी नाक्याकडे अवजड वाहनधारकांची पाठ; ग्रामस्थांचे कारवाईसाठी तहसीलदार

Nandurbar : सीमा तपासणी नाक्यावर टॅक्स न भरता इतर मार्गाने वाहनचालक वाहतूक करतात.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : सीमा तपासणी नाक्यावर टॅक्स न भरता इतर मार्गाने वाहनचालक वाहतूक करतात. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून इतर मार्गाने अवजड वाहने ये-जा करतात. चोरटी वाहतूक बंद करावी, असे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना आजूबाजूच्या २०-२२ गावांतील ग्रामस्थांनी दिले. नवापूर सीमा तपासणी नाक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बेडकी, बंधारफळी, आमपाडा, गडद, करंजी खुर्द, खेकडा, झामणझर, लक्कडकोट, खोकरवाडा, कारेघाट, भवरे, बारी, बिलमांजरे, मुगधन, किलवनपाडा, खरबुर्डी, सुकाफळी, करंजी ओवारा, युवा, भुरीवेल, सागीपाडा, खाटीजांबी येथील रहिवासी व नागरिकांनी निवेदन दिले. (ignoring of heavy vehicles to border check post )

नवापूर तपासणी नाका येथे अवजड वाहने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी न करता व शासनाचा महसूल न भरता बेडकी, बंधारफळीमार्गे करंजी, ओवारापर्यंत जातात. या ठिकाणी बेडकी, बंधारफळी, आमपाडा, गडद, करंजी खुर्द, खेकडा, झामणझर, लक्कडकोट, खोकरवाडा, कारेघाट, भवरे, बारी, बिलमांजरे, मुगधन, किलवनपाडा, खरबुर्डी, सुकाफळी, करंजी ओवारा, युवा, भुरीवेल, सागीपाडा, खाटीजांबी या गावांतील नागरिकांची रहदारी असते व त्यांची वाहनेदेखील ये-जा करीत असतात. (latest marathi news)

अशा वेळी ही वाहने अतिशय जोरात येतात व समोरून येणाऱ्या वाहनांचा कुठल्याही प्रकारे विचार न करता अंगावर जातात व यामुळे अनेकदा अपघातदेखील झालेले आहेत. पत्र प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास व वाहनांची यामार्गे ये-जा बंद न झाल्यास सर्व नागरिक नवापूर येथील तहसील कार्यालय व पोलिस ठाण्याच्या आवारात उपोषण करतील, असे निवेदनात म्हटले आहे.

यांनी दिले निवेदन

निवेदनावर माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप गावित, बोकलझरचे माजी सरपंच राहुल गावित, आयुब गावित, सुनील चौधरी, अरविंद गावित, राजू गावित, सोनू पाडवी, आदन गावित, रिनेश मावची, अशोक गावित, जेशवन गावित, रिकेश गावित, इमानवेल गावित, विजय गावित, कमाजी गावित, गोमा गावित, नीतेश गावित, विजय गावित, वनिस गावित, राहुल गावित, लाजरस गावित, पौलस कुंवर यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT