insufficient water storage esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Irrigation Project : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत अत्यल्प साठा; 4 प्रकल्पांमध्ये ठणठणाट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत एकूण ४६ टक्के साठा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत एकूण ४६ टक्के साठा आहे. त्यात मध्यम प्रकल्पात ६०, तर लघुसिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २३ टक्के साठा आहे. त्यांपैकी चार प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई अटळ असल्याचे चित्र आहे. या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. झाला तोही अवेळी झाला. (Nandurbar Insufficient storage in irrigation projects in district)

त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकांना बसला होता, तर रब्बी पिकांच्या वेळी बेमोसमी पावसाने तोंडातला घास हिरावून नेला होता. अशा स्थितीत पाऊस कमी झाल्याने यंदा सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. त्यामुळे यंदा शेती सिंचनासाठी तर सोडा माणसांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळविण्याकरिता भटकंतीची वेळ येऊ घातली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जरी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असला तरी तो तीन टप्प्यांत आहे. त्यातही तो संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा आहे. त्यांपैकी ऑक्टोबर ते डिसेंबर व जानेवारी ते मार्च असे दोन तिमाही टप्पे निघून गेले आहेत. आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे.

मात्र त्यात प्रशासकीय आकडेवारीनुसार धडगाव तालुक्यात एकाच पाड्यावर टॅंकरने पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे. तर इतर तालुक्यांत विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. असे असले तरी नंदुरबार तालुक्यात आजच पूर्व भागातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्‌भवली आहे. (latest marathi news)

आजमितीस जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्याचा विचार केल्यास अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघु प्रकल्प आहेत. त्यात वीरचक धरण नंदुरबार शहरासाठी जीवनामृत ठरले आहे. तेथूनच शहराला पाणीपुरवठा केला जातो. जोरदार पाऊस झाल्यास या धरणांतील साठा वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ होतो. मात्र मागील वर्षीही कमी पाऊस झाला.

या वर्षीही पाऊस कमी, त्यामुळे धरणातील जलसाठा आजअखेर केवळ २८ टक्क्यांवर आला आहे. त्यात आंबेबारा धरणातून पाणी आणून टाकले जात असल्याने त्यात भर पडली आहे. त्यातून किमान पाच दिवसांआड पाणीपुरवठा शहारला होत आहे. यंदा पाऊस लांबल्यास शेवटच्या टप्प्यात शहरातही पाणीबाणीचे संकट अटळ आहे. असे आजचा जलसाठ्यावरून अंदाज आहे.

जिल्ह्यातील चार प्रकल्प कोरडे

दरम्यान, १२ लघु प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडेठक पडले आहेत. त्यात अमरावती नाला, चौपाळे, घोटाणे व सुसरी प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रकल्पातील जलसाठा (टक्केवारी) असा

मध्यम प्रकल्प ः शिवण २८.८६, दरा ९४ , नागन ७८.११, कोरडी ४७.४३, दहेली ५४, एकूण ६०.१६ टक्के

लघु प्रकल्प ः मेंदीपाडा २२.२९, देवळीपाडा ४५.९०, ढोंग ९.३९, रंकानाला ९८.५८, अमरावती ००, चौपाळे ००, घोटाणे ००, सुसरी ००, नेसू २७.५८, चिरडा १५.१८, धनपूर १९, भुरीवेल ७३ असा एकूण २३.१५ टक्के जलसाठा आहे. मध्यम व लघु प्रकल्प मिळून एकूण ४६.७८ टक्के जलसाठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

पोलिस निरीक्षकांना पदोन्नती अन्‌ अंतर्गत बदल्या! सोलापूर शहरातील 4 ‘पीआय’ पदोन्नतीच्या यादीत, तिघांची होणार खांदेपालट; 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

सोलापूरच्या पोलिस पथकावर पाथर्डीत गोळीबार! जेऊर येथील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरण; साथीदारांसह आरोपी फरार, अक्कलकोट तालुक्यातील एकजण अटकेत

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ जून २०२६ ते १२ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

साधी कॉफी विसरा! केळं घालून बनवा व्हायरल Banana Coffee; शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT