Dhule Lok Sabha Constituency : तरूणांसह हजारावर शेतकरी वाऱ्यावर! नरडाणा औद्योगिक केंद्राचा प्रश्‍न

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावत असतो. या मतदारसंघावर भाजपची पक्की पकड आहे.
Nardana
Nardana esakal

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावत असतो. या मतदारसंघावर भाजपची पक्की पकड आहे. या क्षेत्रातील बाभळे शिवारात केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटर विकासाकडे झेपावत आहे. परंतु, सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून विनाप्रकल्प अडकवून ठेवलेल्या जमिनींमुळे गरजू उद्योजकांना प्लॉट मिळत नसल्याने असंख्य तरूणांना रोजगाराची संधी नाही. (Dhule Lok Sabha Constituency)

तर सेंटरच्या विस्तारीकरणाचा प्रश्‍न भिजत ठेवल्याने हजारावर शेतकरी नाहक वेठीला धरले गेले आहेत. ते ठाऊक असूनही सत्ताधारी भाजप हा प्रश्न‍ सोडविण्यासाठी ताकद पणाला का लावत नाही हे न सुटणारे कोडे ठरले आहे. अविकसित भागांची निवड करून तेथे सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने ग्रोथ सेंटर (औद्योगिक विकास केंद्र) निर्माण केले आहेत.

त्यात जवळ तापी नदी, सुरत- भुसावळ रेल्वेमार्ग, मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नरडाणा- बाभळे शिवार ग्रोथ सेंटरसाठी निवडले गेले. काँग्रेसच्या राजवटीत १९९४ ला या सेंटरची स्थापना झाली.

आधी निवडणुकांसाठी वापर

अनेक वर्षे ग्रोथ सेंटरचा वापर केवळ निवडणुका जिंकण्यासाठी झाला. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि उदासीनतेमुळे अनेक वर्षे नरडाणा ग्रोथ सेंटरकडे उद्योजक फिरकलेच नाहीत. परिणामी, रोजगार उपलब्धी, उद्योग- व्यवसायांना चालना मिळण्याचे स्वप्न धूसर होत गेले.

नंतर रोजगारनिर्मितीचा रेटा वाढल्याने २००० पासून सरासरी ६५३ हेक्टरवरील ग्रोथ सेंटर परिसरात पायाभूत सुविधांचा विकास होण्यास सुरूवात झाली. सेंटर स्थापनेत नरडाण्यासह वारूड, जातोडा, वाघोदे, बाभळे, वाघाडी खुर्द व वाघाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांची जमिनी दिल्यात. (latest marathi news)

Nardana
Dhule Code Of Conduct : परवानाधारकांची 482 शस्त्रे जिल्ह्यातून जमा; लोकसभा निवडणुकीमुळे कार्यवाही

विस्तारीकरण रखडले

ग्रोथ सेंटरच्या फेज- ३ मधील विस्तारीकरणात औद्योगिक विकास महामंडळाने २०११ पासून हजारावर शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत `भूसंपादनात समाविष्ट`, असा शेरा सातबाऱ्यावर मारला. त्यामुळे गेल्या १४ वर्षांपासून शेतकऱ्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनीचा मोबदलाही मिळत नाही व सातबाऱ्यावरील शिक्केही काढले जात नाहीत.

अशी गंभीर स्थिती आहे. परिणामी, नरडाणा, माळीच, गोराणे व वाघोदे परिसरातील कोरडवाहू व बागायतदार शेतकऱ्यांना जमिनी विकताही येत नाहीत व त्यांना बँका कर्जही देत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी, ग्रोथ सेंटरचे विस्तारीकरणही रखडले आहे.

गुंतवणुकीवर परिणाम

काँग्रेसच्या राजवटीत केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटरचा धिम्या गतीने विकास, नंतर २००९ पासून लोकसभेचा धुळे मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतल्यानंतरही पीडित हजारावर शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही. त्यामुळे ग्रोथ सेंटरच्या फेज- ३ मधील साडेसहाशे हेक्टरचे भूसंपादन रखडले आहे.

शिवाय ग्रोथ सेंटरच्या फेज १ व फेज २ मध्ये ३५५ हेक्टर जमीन संपादित झाली असून, पैकी सरासरी ४० टक्क्यांवर जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरू आहेत. उर्वरित भूखंड विनाप्रकल्प काही व्यक्ती, भूमाफियांनी अडकवून ठेवले आहेत.

Nardana
Dhule Milk Rate Hike : चाराटंचाईमुळे दुधाची दरवाढ! म्हशीचे 70, तर गायीचे 55 रुपये लिटरने विक्री

त्यामुळे गरजू उद्योजकांना जमिनी अर्थात प्लॉट मिळत नसल्याने असंख्य बेरोजगार तरूणांना रोजगाराच्या संधीपासून मुकावे लागत आहे. या सर्व स्थितीचा परिणाम नरडाणा ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने गुंतवणूक होत नसल्याने आर्थिक उलाढाल वाढीला संधी उरलेली नाही.

जाब द्यावा लागणार

केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सरकार, मध्यंतरी अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असतानाही केवळ त्यांच्या उदासनीतेमुळे ग्रोथ सेंटर समस्यांशी झुंजत आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ आणि धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही दीड दशकापासून हा प्रश्‍न दुर्लक्षित राहिला आहे.

त्याचा जाब मतदारांना द्यावा लागणार आहे. सद्यःस्थितीत नरडाणा ग्रोथ सेंटरमध्ये देशातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट, वंडर सिमेंट, जिंदाल पॉवर, बेदमुथा वायर यासह विविध मोठ्या गुंतवणुकीचे उद्योग कार्यरत आहेत.

Nardana
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभेचा उमेदवार बदला काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी; जिल्हाध्यक्ष सनेर यांचा राजीनामा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com