Crowd of women in Talathi office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : रोजगार बुडवून शासकीय कार्यालयात महिलांची गर्दी! उत्पन्नाची अट शिथिल करूनही नागरिकांची फिरफीर

Nandurbar News : बोरद गावात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर तलाठी कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : बोरद परिसरातील प्रत्येक गावात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर तलाठी कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बोरद येथे सकाळी आठपासून तलाठी कार्यालयात व ग्रामपंचायतीत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. (Ladki Bahin Yojana Crowding of women in government offices by reducing employment)

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ज्यात उत्पन्नाचा दाखल, जन्म-मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, तसेच अर्ज भरून घेणे, आधार अपडेशन करणे इत्यादी कामांसाठी मोठी गर्दी केली जात आहे. त्यामुळे बोरद गावातील तलाठी भरत बारी सकाळी आठपासून कार्यालयात हजर होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तळ ठोकून आहेत. बँक खाते काढण्यासाठीदेखील महिला व पुरुष बँकेत गर्दी करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे महिला व पुरुष आपला रोजगार बुडवून कागदपत्र गोळा करण्यासाठी इतरत्र फिरत आहेत. दरम्यान, परिसरात महिलांमध्ये माहितीचा अभाव असल्याने काहींना कागदपत्रे गोळा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अशा सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज असल्याचे बोलले जात आहे.

शासनाने नुकत्याच जाहीर केल्यानुसार अनेक कागदपत्रे शिथिल करण्यात आली आहेत, तरीदेखील अनेक महिला व पुरुष अज्ञात व्यक्तीने जसे सांगितले तसे इतरत्र फिरताना दिसून येत आहेत. अशात ग्रामीण भागात एजंटदेखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. काही ना काही कारण सांगून लोकांना भूलथापा देऊन पगार सुरू करून देण्याचे आमिष दाखवून पैसे लुटले जाण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. (latest marathi news)

अशा थापाड्यांचा व लुटारूंचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच परिसरात असणाऱ्या ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व सदस्य आपल्या गावातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गावातच अर्ज भरण्याचे काम करीत आहेत.

तसेच सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कलावती फाउंडेशनतर्फेदेखील नागरिकांसाठी अर्ज भरण्याचे काम युद्धपातळीवर केले जाते आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील जनता तालुक्याच्या ठिकाणी दररोज चकरा मारत रोजगार बुडवून कागदपत्र जमा करताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही. त्याबाबत शासनाने अट शिथिल केली आहे. म्हणून बोरद येथील नागरिकांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात येऊ नये. यात आपला आणि प्रशासनाचा वेळ जाईल आणि आपलेदेखील आर्थिक नुकसान होईल म्हणून आपण उत्पन्न दाखल्यासाठी अट्टाहास करू नये. सर्व नागरिकांनी व सर्व सेतू केंद्रचालक यांनीही सामाजिक बांधिलकी ठेवून लोकांमध्ये योजनेविषयी जनजागृती करावी." - भरत बारी, तलाठी, बोरद (ता. तळोदा

योग्य मार्गदर्शन हवे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न व डोमेसाईल या मुख्य कागदपत्रांची अट शासनाने शिथिल केली आहे. तसेच दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असूनदेखील नागरिक सेतू केंद्र व तलाठी कार्यालयांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन व योजनेची परिपूर्ण माहिती देणे गरजेचे झाले आहे. नागरिकांना वेळेत माहिती मिळाल्यास गैरसोय टाळण्यास मदत होईल व नागरिकांचा रोजगार बुडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT