Employees in various parts of the city while cleaning and spraying by the municipality.
Employees in various parts of the city while cleaning and spraying by the municipality. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Impact : शहरातील विविध भागांत पालिकेतर्फे फवारणी सुरू; 8 दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी पूर्ण करण्यात येईल

सकाळ वृत्तसेवा

शहादा : शहरात वाढलेल्या डास आणि चिलट्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध भागांत धुरळणी, फवारणी करण्यात येत आहे. याबाबत ‘सकाळ’ने सोमवारी (ता. ८) ‘डासांमुळे शहादावासीयांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. शहादा पालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. (Nandurbar Spraying started by municipality in various parts of city)

शहराच्या कानाकोपऱ्यांत ठिकठिकाणी घाणीचे ढीग व उघड्या गटारींमुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे नागरिकांना विविध आजाराने ग्रासले आहे. लहान-मोठे क्लिनिकही हाउसफुल झाले आहेत. पालिकेकडून नियमित फवारणी व धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, डासांमुळे शहरातील लाखो लोकांचा आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होत होता.

शहराच्या विविध प्रभागांमध्ये ठिकठिकाणी शोषखड्डे नसल्याने मोकळ्या भूखंडांवर पाणी सोडण्यात आले आहे. अनेक नळांना तोट्या नाहीत. मोकळ्या मैदानात काटेरी झाडे वाढली आहेत. गटारी उघड्या आहेत. परिणामी, डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना नानाविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

शहरात फवारणी सुरू

शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पालिकेतर्फे तत्काळ उपाययोजना करण्यात येत असून, त्यात दोन ट्रॅक्टर व दोन फॉगिंग मशिनद्वारे शहरात औषधांची फवारणी करण्यात येत आहे. (latest marathi news)

पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दिनेश सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक तथा पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे, लिपिक गोटूलाल तावडे, कर्मचारी गणेश मोरे, गणेश बाशिंगे, शंकर चरणदास, संतोष कडोले, हिमांशू अहिरे, इरफान मेहतर आदींसह कर्मचारी उपलब्ध साहित्यांच्या आधारे शहरात फवारणी करीत आहेत.

"नागरिकांनी स्वच्छतेबाबत पालिकेस सहकार्य करावे. सांडपाणी बाहेर सोडू नये. कचरा घंटागाडीत टाकावा. शहरात सध्या दोन ट्रॅक्टर व दोन फॉगिंग मशिनद्वारे फवारणी सुरू आहे. त्यात भर करून पुन्हा दोन ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेऊन डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी करण्यात येईल. येत्या आठ दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी पूर्ण करण्यात येईल." - दिनेश सिनारे, मुख्याधिकारी, शहादा पालिका, शहादा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT