herb-coriander.jpeg
herb-coriander.jpeg 
उत्तर महाराष्ट्र

महिलांनो..रोजच्या जेवणात वापर होणा-या कोथिंबीरचा भाव कळला का?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला व शेतमालाची बाजारातील आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. २) नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीला तब्बल तीस हजार रुपये शेकडा म्हणजेच प्रतिजुडी ३०० रुपये असा दर मिळाला. 

कोथिंबीर जुडीला ३००रुपये भाव 

अवकाळी पावसामुळे शनिवारी शेतकऱ्यांना रोजच्या तुलनेत २० टक्केही भाजीपाला बाजारात आणता आला नाही. अशाही परिस्थितीत ज्यांनी महत्प्रयासाने कोथिंबीर विक्रीसाठी आणली, त्यांना मात्र चांगला बाजारभाव मिळाला. सिन्नर येथील प्रकाश बदादे यांनी २०० जुड्या नाशिकमध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या. येथील साईनाथ व्हेजिटेबल कंपनीने लिलाव केला असता, त्यांना तीस हजार रुपये शेकडा असा भाव मिळाला. कोथिंबिरीला प्रतिजुडी तीनशे रुपये भाव मिळाल्याने बदादे यांनी समाधान व्यक्‍त केले. यापूर्वी याच कंपनीने ३४ हजार रुपये शेकडा दराने कोथिंबीर विकत घेऊन पुढे पाठवली होती, असे कंपनीचे संचालक राजेंद्र भोरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT