live 
उत्तर महाराष्ट्र

अवकाळीच्या मदतीसाठी 1836 कोटीची गरज 

सकाळ वृत्तसेवा

नाशिकः ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिण्यातील अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील 23 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या 21 लाख 59 हजार 449 हजार हेक्‍टरवरील पीक उध्वस्थ झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार, 1836 कोटी 88 लाखाची मागणी केली असून विभागाला 572 कोटी 53 लाख मिळाले आहे. नुकसान मोठे असल्याने केंद्र शासनाकडून आधिकाधीक मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी आज केंद्रीय पथकाकडे करण्यात आले. 

केंद्रीय पथकाला महसूल यंत्रणेचे साकडे 
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे दोन सदस्यांचे पथक आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ, शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र पथकाने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहाला बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पीक पाहणी केली. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा कृषी अधिक्षक संजीव पडवळ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदीसह कृषी विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

अवकाळीचे 12 दिवस 
उत्तर महाराष्ट्रात सरासरी 953.25 मि.मी पाउस पडतो मात्र यंदा नोव्हेंबरपर्यत 129.87 टक्के पाउस झाला. एरव्ही पाउस न होणाऱ्या ऑक्‍टोबर - नोव्हेंबरचा अवकाळी पाउस हे यंदाच्या नुकसानीचे प्रमुख कारण आहे. ऑक्‍टोबरला नाशिक 11, धुळे 8 नंदुरबार 4, जळगाव 12 तर नगरला 16 दिवस पाउस झाला. साधारण उत्तर महाराष्ट्रात 10 दिवस तर नोव्हेंबर महिण्यात नाशिक 2, धुळे-नंदुरबार 1 जळगाव-नगरला 3 दिवस पाउस झाला. उत्तर महाराष्ट्रातील पिक स्थितीसाठी हा पाउस अभूतपूर्व धक्का ठरला असे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले. 

बैठकीनंतर पाहणी 
पथकाने निफाड तालुक्‍यातील पाचोरे वणी येथील बाळू वाटपाडे यांच्या मका पिकाची पाहणी, भास्कर वाटपाडे यांचे सोयाबीन पिकाची तर बाजीराव गंगाधर यांचे द्राक्षाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्याशी चर्चा केली. चांदवड तालुक्‍यातील खडक मालेगांव येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे मिरची व द्राक्षे, रंगनाथ शिंदे यांचे सोयाबिन व मका रंगनाथ पोपट शिंदे यांच्या ज्वारी व बाजरी पिकांची पाहणी केली. दहेगांव येथील अण्णा कनोर व धर्मा कनोर यांच्या कांदा पिकाची,  निमोण गावातील मनोज ललवाणी व पंढरिनाथ देवरे यांचे कांदा पिकाची तर शंकर गांगुर्डे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी करून पंचनाम्याची तपासणी केली. मालेगांव तालुक्‍यातील चौंडी येथील अशोक सरोदे यांचे भुईमुग, लक्ष्मण सरोदे यांचे कांदा व डांळींब पिकाची पाहणी तर वऱ्हाणे गावातील रमेश पवार यांचे कांदा पिकाची तर भाऊसाहेब अहिरे यांचे मका पिकाची पाहणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT