Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

देवळालीत बारा बंगल्यांचे आकर्षण 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः सैन्यदल अन्‌ स्थानिकांचे एकत्रित कामकाजातून देवळाली छावणी परिषदेचा कारभार चालतो. सोळा सदस्यांच्या मंडळात आठ सदस्य सैन्यदलाचे तर आठ सदस्य जनतेचे प्रतिनिधी असतात,अशा या देवळालीत 103 वर्षांचे पारशी बांधवांचे अग्नीमंदिर आहे.

तसेच ब्रिटीशकालीन बारा बंगले सुस्थितीत आहे. एक दोन नव्हे तर शंभर वर्षांची दुर्मीळ गोरख चिंच हे या भागाचे वैभव आहे. 
छावणी परिषदेचे अध्यक्ष सैन्यदलाचे ब्रिगेडिअर पी. रमेश आहेत तर आठ सदस्यांनी उपाध्यक्षपदी भगवान कटारिया यांची निवड केली आहे. छावणी परिषदेची लोकसंख्या 54 हजार असून त्यात आठ वॉर्ड आहेत. सिन्नर, इगतपुरी व नाशिक तालुक्‍यातील रुग्णांसाठी छावणी परिषदेच्या रुग्णालयातून आरोग्याची सुविधा उपलब्ध होत आहे. येथे दररोज तीन हजार रुग्णांची "ओपीडी' आहे. परिसरात खंडेराव टेकडीवरील खंडेराव, विठ्ठल-रुखमाई, रेणुकामाता आदी मंदिरे आहेत. खंडेराव टेकडीवरील यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल होते. शिंगवे बहुला गावात अनेक पहिलवान आहेत. पांडुरंग पाटोळे, भाऊसाहेब मोजाड, वस्ताद रामचंद्र पाळदे हे राष्ट्रीय पंच असून राणू मोजाड या मल्लांनी माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्याशी कुस्ती खेळल्याची आठवण स्थानिकसांगतात. भजनी मंडळात सदाशिव मोजाड, ज्ञानेश्‍वर निसाळ, विठ्ठल गावंडे, जयश्री गावंडे, उत्तम वावरे,जनेंद्र राजपूत,बाळासाहेब पाळदे आदी सहभागी होतात. इथले राहुल निसाळ हे कॅप्टन झाले आहेत. शिवाय दोनशे तरुण सैन्यदलात दाखल झाले आहेत. उद्योजक वासुदेव श्रॉफ यांचे जन्मस्थान असून अभिनेत्री भूमिका चावला इथली आहे. अभिनेते दिलीपकुमार यांचे या भागाशी अतूट नाते आहे. गेल्या बारा वर्षांपासून वृक्षमित्र तानाजी भोर हे नाशिक-शिर्डी पायी यात्रा काढतात. या परिसरात ब्रिटीश काळातील बारा देखणे बंगले पारशी बांधवांनी सुस्थितीत ठेवले आहेत. एम. के. बिरमानी आणि ब्रिटीश अधिकारी जे. येन. लाम यांच्या 1919 मधील बंगल्याचा त्यात समावेश आहे. 

चिनॉय कुटुंबियांनी उभारले अग्नीमंदिर 
उत्तर महाराष्ट्रातील श्रद्धेचे स्थान देवळाली कॅम्प परिसरातील "द झोरोस्ट्रीयन फायर टेम्पल' अर्थात, अग्यारी (अग्नीमंदिर) 103 वर्षे जूने आहेत. हैदराबादमधील चिनॉय कुटुंबियांनी त्यांची 1916 मध्ये उभारणी केली. पारसी समाज अग्नीला देव मानतो. मंदिरात दिवसातून पाच वेळा पूजा केली जाते. मंदिरात इतरांना जाण्यास मनाई आहे. गेली 103 वर्षे अखंड अग्नी प्रज्वलित आहे. जिल्ह्यात पारसी बांधव ऐंशीच्या तर देवळाली कॅम्पमध्ये साडेतीनशेच्या आसपास आहेत. देशात आठ अग्यारी असून मुंबईमध्ये चार, नवसारीमध्ये एक, सूरतमध्ये दोन आणि नाशिकमध्ये एक आहे. 

देशामध्ये 62 छावणी परिषद असून त्यात महाराष्ट्रातील सात परिषदांचा समावेश आहे. छावणी परिषदेच्या रुग्णालयाने राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच छावणी परिषदेला स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. 
- भगवान कटारिया (उपाध्यक्ष, छावणी परिषद) 

आमच्या छावणी परिषद परिसर दाट वृक्षांनी सजलेला आहे. मी नाशिक तालुका आणि इगतपुरी परिसरातील शाळांमध्ये स्वखर्चाने आतापर्यंत सत्तर हजार वृक्षांची लागवड केली आहे. 

- तानाजी भोर (वनश्री पुरस्कार विजेते) 

द झोरोस्ट्रीयन फायर टेम्पल' अर्थात अग्यारी (अग्नीमंदिर) इथे पुजारी (प्रिस) म्हणून सेवा बजावत आहे. आमच्या समाजबांधवांची संख्या कमी झाल्याने आता पुजारी कमी झाले आहेत. पुजारीला मंदिरात चोवीस तास थांबावे लागते. ते आताची पिढी करत नाही. आमच्या या दुर्मिळ वास्तूचे जतन होणे आवश्‍यक आहे. 
- नोझल मेहंती (पुजारी, अग्नीमंदिर) 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT