Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

रानभाज्यांचे माहेरघर  खरोली 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. 5 ः नाशिकचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारुपाला आलेल्या खरोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावात मुंबईकर भटकंती अन्‌ "वीक एंड'ला येतात. ग्रामस्थांनी अडीच एकरात श्रमदान करून शेततळे तयार केले. गावच्या जंगलात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत. 

गावाजवळ दहा फार्महाऊस उभारण्यात आले आहे. एका कंपनीने परिसरात "हील स्टेशन' योजनेची उभारणी केल्याने त्याचा फायदा गावाला झाला. रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास असून गावात हनुमान, मरीआई हे दोन मंदिरे आहेत. पंचवीस वर्षांपासून गावात अखंड हरिनाम सप्ताह होतोयं. गावाच्या पूर्वेला वैतरणा, तर उत्तरेला पेजा नदी वाहते. गावात साठ वर्षांपासून भजनी मंडळ कार्यरत आहे. त्यात सुरेश रायकर, मधुकर आहेर, नामदेव आहेर, चंदर मेंगाळ, काशीनाथ रायकर यांचा सहभाग असतो. याच गावातील देवराम आगिले, गंडी गोरे, काळू पेहेरे हे मल्ल त्र्यंबकेश्‍वर भागात प्रसिद्ध होते. जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा गावात आहे. इथली जल स्वराज पाणी योजना बंद पडली असून गावाने स्वखर्चाने विहिरीतून पाणी आणले आहे. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडल्यावर महिलांना दोन किलोमीटर दूर जाऊन डोईवरुन पिण्याचे पाणी आणावे लागते. गावात दवाखाना नाही. चोहोबाजूने डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाशेजारी घाट आहे. रुग्णाला त्र्यंबकेश्‍वरला उपचारासाठी न्यावे लागते. 
भैरोबाचा डोंगर आणि मरीआई टेकडी गावाजवळ आहे. गावाला मोठे गायरान आहे. तसेच वनविभागाच्या क्षेत्रात कोल्हा, तरस आणि रानडुक्कर आहेत. गावातून दरवर्षी दिंडी निघते. पन्नास वर्षांपासून ही परंपरा जोपासण्यात आली आहे. गावातील शंभर वारकरी दिंडीत सहभागी होतात. याशिवाय गावात वाघे-मुरळी कलावंत आहेत. वसंत बोडके, काळू आहेर, वसंत आहेर, पुंडलिक भडांगे आदींसह वीस कलाकार इथे आहेत. 

गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. तसेच गावाकडे येणारे रस्ते खराब झाले आहे. गावाच्या चारही बाजूला डोंगर दऱ्या असल्याने पर्यटन क्षेत्र म्हणून परिसर विकसित झाल्यास गावासह इतर पाड्यांना रोजगार उपलब्ध होईल.
- चंदर मेंगाळ (सरपंच) 

गावाची पाणी योजना बंद झाल्याने आम्ही श्रमदानातून शेततळे केले. गावात पर्यटक मोठ्याप्रमाणात येतात. नैसर्गाच्या कृपेमुळे धबधबे पर्यटकांना खेचून आणतात. 
- राजाराम आहेर (पोलिस पाटील) 

आमच्या गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावात पायी जावे लागते. रस्त्यात जंगल आहे. रस्ता खराब आहे. गावात दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था व्हावी असे वाटते. 
- सिद्धार्थ साबळे (विद्यार्थी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT