उत्तर महाराष्ट्र

शहर बससेवेबाबत वास्तवदर्शी अहवाल सादर करा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने सर्वंकष वाहतूक आराखडा सादर करून शहर बस वाहतूक चालविण्यास घेण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त केली होती. त्या क्रिसिल संस्थेचे आजपासून काम सुरू झाले. पुढील तीन महिन्यांत वास्तवदर्शी अहवाल सादर करण्याच्या सूचना संस्थेला देण्यात आल्या.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला क्रिसिलचे अभय वर्तक, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, शहर अभियंता यू. बी. पवार, स्मार्टसिटीचे सीईओ प्रकाश थविल, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके व बाजीराव माळी उपस्थित होते. ऑगस्टमध्ये महापालिकेला वाहतुकीचा सर्वंकष आराखडा सादर करण्यात आला होता. त्यात पुढील वीस वर्षांचा विचार करून वाहतुकीची स्थिती दर्शविली होती. सक्षम वाहतुकीसाठी रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, प्रस्तावित रिंगरोड, सायकल ट्रॅक आदींचा विचार करण्यात आला होता. सद्यःस्थितीत शहरात ६९८ बसगाड्यांची गरज नमूद केली होती. आराखडा सादर झाल्यानंतर महापालिकेला शहर बससेवा चालविणे परवडेल का?, महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी का? या विषयांवर सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार क्रिसिल कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. पंधरा लाख खर्चून तीन महिन्यांत अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सर्वेक्षणात महत्त्वाच्या बाबी
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महापालिकेने ताब्यात घ्यावी का?
बससेवा सुरू करायची असेल, तर किती बसची आवश्‍यकता आहे?
आर्थिकदृष्ट्या महापालिकेला परवडेल का?
महापालिका किंवा खासगीकरणातून बस चालविता येईल का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT