उत्तर महाराष्ट्र

युवा डॉक्‍टरांनो, कट प्रॅक्‍टिसपासून दूर राहा - गिरीश महाजन

सकाळवृत्तसेवा

नाशिक - वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्‍टिसचा रोग लागला आहे. वेगवेगळ्या तपासण्यांवर 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमिशन घेतले जाते. वैद्यकीय सेवेत मोठ्या प्रमाणावर बोकाळलेल्या कट प्रॅक्‍टिससंदर्भात विधानसभेत कायदा केला जाणार आहे; परंतु अशा प्रकारे कायदा करावा लागणे दुर्दैव आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्यास सज्ज झालेल्या भावी डॉक्‍टरांनी कट प्रॅक्‍टिसपासून दूर राहावे, असे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलपती, वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत झालेल्या सतराव्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. 

महाजन म्हणाले, की विविध मागण्यांसाठी डॉक्‍टरांकडून संप केले जातात. बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनातीची मागणी होते. वास्तविक डॉक्‍टरांकडे देवाप्रमाणे पाहिले जाते. त्यांच्या दारात बंदूकधारी रक्षक शोभणार नाहीत. डॉक्‍टरांनी रुग्ण व नातेवाइकांशी व्यवस्थित संवाद साधल्यास बहुतांशी प्रश्‍न सुटतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. एकीकडे समाजातील तळागाळापर्यंत आरोग्यसेवा पोचविताना आजच्या काळात उद्‌भविणाऱ्या विविध आजारांवर संशोधनातून उपचार पद्धतीचा शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी पेलायचे आहे. 

74 सुवर्णपदकांसह  22 पीएचडी प्रदान 

वैद्यकीय अभ्यासक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 74 सुवर्णपदकांचे वितरण करण्यात आले. 22 विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या आठ हजार 883 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT