उत्तर महाराष्ट्र

लढवय्ये ४७१ तोपची देशसेवेसाठी सज्ज

सकाळवृत्तसेवा

नाशिक - आपल्या मुलाने इतरांपेक्षा वेगळे क्षेत्र निवडून ‘करिअर’ करावे, नावलौकिक मिळवावा, असे प्रत्येक पालकाला वाटते. देशभक्ती व राष्ट्रनिष्ठा मनी बाळगणारे काही पालक तर ठरवूनच मुलांना सैन्यदलात पाठविण्याचा धाडसी निर्णय घेतात. यामागे देशसेवेचे बीज त्यांच्या मनामनांत, अंगी रुजावे आणि तो देशभक्तीसाठी सदैव तत्पर राहावा एवढाच हेतू असतो. आपले मूल लष्कराला समर्पित करून अशाच कणखर बनलेल्या ४७१ माता-पित्यांचा आज गौरव करण्यात आला. तोफखान्यातील या सोहळ्यात सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांच्या साक्षीने भारत हाच धर्म आणि देशासाठी बलिदानाची शपथ घेण्यात आली.

भारतीय लष्कराला ४७१ तरुण (मुले) सुपूर्द करणाऱ्या विविध प्रांतातील पालकांचा दक्षिण-पश्‍चिम विभागाचे मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह (व्हीएसएम) यांनी विशेष गौरव पदक देऊन सन्मान केला. वर्षाला तीन हजारांवर तोपची घडविणाऱ्या नाशिक रोड तोफखाना केंद्रात ४३ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या तुकडीने पालकांच्या साक्षीने शानदार संचलन करत सर्वांचेच लक्ष वेधले. संचालनानंतर प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण दाखविण्यात आले. विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या बवंशी मंजुनाथ (संचलन), विकास कुमार (पीटी), विजय बुटाभाई मेवाडा (शस्त्र प्रशिक्षण), हरजितसिंह (बेस्ट गनर), देवेंद्रकुमार शर्मा (टीए), अभिषेक मेथिया (बेस्ट ऑपरेटर), सुरेंद्र कुमार आदी पुरस्कार देऊन गौरविले. तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासह देशभरातील विविध प्रांतातून आलेले पालक सहभागी झाले होते.  

आयुधांचे पूजन, तोफेला सलामी 
तत्पूर्वी, भल्या पहाटे थंडीत तुकडीतील जवानांनी आयुधांचे पूजन करत प्रातिनिधिक स्वरूपात रशियन बनावटीच्या १३० एमएम तोफेला सलामी देत संचलन केले. प्रमुख अतिथी मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर तोफखाना केंद्रातर्फे भारतीय लष्कराला मूल सुपूर्द केल्याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनी विविध प्रांतातून आलेल्या जवानांच्या माता-पित्यांना गौरवपदक देत सन्मान केला. काल रात्रीपासून तर अनेक जण भल्या पहाटेपासून विविध भागातून लष्करात भरती झालेल्या मुलाला भेटायला आले होते. मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. रेल्वेस्थानक ते तोफखाना केंद्राच्या मार्गावर भल्या पहाटेपासून मोठी वर्दळ होती.

माता-भगिनीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू 
तीन-साडेतीन वर्षांपासून घरापासून दूर असलेल्या घरातील मुलाला पाहण्यासाठी अनेकांच्या आई, आजी, बहिणी आतुर होत्या. संचलनानंतर एकसारख्या पोशाखातील गर्दीत प्रत्येक भगिनीच्या नजरेत मुलाला भेटण्याची आस दिसली. काही अगदी ज्येष्ठ व वयोवृद्ध महिलांनी गणवेशातील नातवाला पाहून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही बहिणींनी भावाला पाहून हुंदके दाटून आलेल्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून दिली.

लष्करात येण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल. आजपासून भारत हाच तुमचा धर्म आहे. युद्धातील निर्णायक ही भारतीय तोफखान्याची ओळख आहे. तुम्ही आता तोफखान्याचे तोपची आहात. त्यामुळे लष्कराची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक तोपचीने आयुष्यभर शिकत शिकत स्वतःला विकसित करायचे. बलिदान हा लष्करात सर्वोच्च क्षण असतो. अशा सर्वोच्च क्षणी देशासाठीच्या बलिदानासाठी सदैव तयार असल्याची मानसिकता साधायची आहे.
- मेजर जनरल पी. पी. प्रकाशसिंह (व्हीएसएम)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT