उत्तर महाराष्ट्र

बोगस अपंग प्रमाणपत्रप्रकरणी जि.प.चे दहा शिक्षक निलंबित

सकाळवृत्तसेवा

नाशिक - बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नगर जिल्हा परिषदेपाठोपाठ नाशिक जिल्हा परिषदेनेही आता कारवाईला सुरवात केली आहे. प्रशासकीय बदलीत सवलती मिळविण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचेही आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिक्षण विभागाने आणखी २५० शिक्षकांची अपंग प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाठविल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

जिल्हा परिषदेत दर तीन वर्षांनी प्रशासकीय बदल्या होतात. या बदल्यांमध्ये अपंग कर्मचारी व ५३ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीचे ठिकाण देण्याची सवलत आहे. तसेच सेवाज्येष्ठता यादीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास पेसा भागात काही वर्षे नोकरी करणे बंधनकारक आहे. पेसा भागात जाणे टाळण्यासाठी व सोयीचे ठिकाण मिळविण्यासाठी अनेक कर्मचारी बदलीच्या काळात दुर्धर आजार किंवा अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे देऊन बदलीत सवलत मिळवितात; परंतु हे बोगस प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, जवळपास २५ टक्के कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे दाखले सादर केले आहेत. 

प्राथमिक शिक्षक परिषदेने याबाबत आवाज उठवून अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली होती. त्याच काळात आमदार बच्चू कडू जिल्हा परिषदेला भेट देणार असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे सादर झालेल्या अपंग प्रमाणपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महामंडळ, मुंबईतील जे. जे. रुग्णालय येथून पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील २५० शिक्षकांची अपंग प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाठविली आहेत.

प्रमाणपत्रांमध्ये खाडाखोड
प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. मिणा यांना दिलेल्या निवेदनासोबत काही शिक्षकांच्या बोगस अपंग प्रमाणपत्रांबाबत तक्रार केली होती. शिक्षण विभागाने त्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली. त्यानुसार अपंग प्रमाणपत्र बोगस असणे किंवा त्यामध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले. त्यानुसार दहा शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या शिक्षकांमध्ये बागलाण तालुक्‍यातील देवीदास भामरे, दिलीप वाघ, जयंत महाले, राजाराम खैरनार, नाशिक तालुक्‍यातील वैशाली सोनवणे, कळवण पंचायत समितीतील राहुल सोनवणे, लीला रौंदळ, सतीश अहिरे, अनिल भामरे व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दिलीप पवार यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT