उत्तर महाराष्ट्र

पाचव्या माळेपर्यंत सात "सौभाग्याचे लेणे' चोरी 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - सोनसाखळीचोरांनी पुन्हा उच्छाद मांडला असून, उपनगर परिसरात आज दुपारी सोनसाखळीचोरीच्या तीन घटना घडल्या. नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेपर्यंत मंगळसूत्र लांबविण्याच्या सात घटना घडल्या आहेत. "आदिशक्तीं'च्या या उत्सवादरम्यानच अशा घटना घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्सवकाळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याचा दावा केला असताना अशा घटना घडतातच कशा, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. 

पाचव्या माळेला दुपारी दीड तासात तीन महिलांचे सौभाग्याचे लेणे ओरबाडले. दुपारी दीडच्या सुमारास शुभांगी जोशी पिंटो कॉलनीतून रस्त्याने पायी जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनसाखळी खेचली. या प्रकरणी अजय जोशी यांनी उपनगर पोलिसांत फिर्याद दिली. या घटनेनंतर अवघ्या दीड तासात आणखी दोन घटना घडल्या. 

दुसरी घटना शाहूनगर परिसरात घडली. सुनीता महाजन भजनासाठी जात होत्या. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत लांबविली. तिसरी घटना लोकमान्यनगर परिसरात घडली. जयश्री अहिरे देवीच्या भजनासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत ओरबाडली. याच परिसरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांनी संशयित चोरट्यांचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते औरंगाबाद रोडच्या दिशेने वेगात निघून गेले. उपनगर पोलिस घटनास्थळी पोचले. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये संशयिताचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता. 

पाच दिवसांत सात घटना 
घटस्थापनेपासून पाच दिवसांमध्ये महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याच्या सात घटना घडल्या. अंबड व गंगापूर पोलिस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. आज उपनगर पोलिस हद्दीमध्ये एकाच दिवशी तीन घटना घडल्या. तसेच तुपसाखरे लॉन्स येथे सोनसाखळी ओरबाडून पलायन केलेल्या संशयिताला लगेचच अटक करण्यात आली. भद्रकाली परिसरात एका महिलेची सोन्याची पोत चोरीला गेली, मात्र त्याची पोलिसांत अद्यापही नोंद नाही. त्यामुळे पोत ओरबाडली की गहाळ झाली याबाबत अद्यापही साशंकता असून, महिलेने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. गेल्या महिनाभरात आतापर्यंत सुमारे 15 सोनसाखळीचोरीच्या घटना घडल्या. 

सोनसाखळी ओरबाडल्याच्या तीन घटना घडल्या असून, दोन पथके तयार करून संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत. यात्रोत्सवातही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवतानाच महिलांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यात्रोत्सवामध्ये अद्याप चोरीचा प्रकार घडलेला नाही. 
-अशोक नखाते, सहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT