उत्तर महाराष्ट्र

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या युवा प्रतिभेचा जागर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट-२०१७’चे उद्‌घाटन आज सपकाळ नॉलेज हब, अंजनेरी, नाशिक येथे सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमासाठी उद्‌घाटन म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, स्पेक्ट्रम ॲकॅडमीचे संचालक सुनील पाटील  आदी उद्‌घाटनाच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. 

तसेच आज होणाऱ्या मार्गदर्शक पाहुण्यांमध्ये मोटीव्हेशनल स्पिकर्स सचिन बुर्घाटे, उद्योजक पियूश सोमाणी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक विशाल संगमनेरे, जि. प. सदस्या अमृता पवार, अभिनेता चिन्मय उद्‌गीरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच पुढील तीन दिवसात  होणाऱ्या विविध सत्रांत सुजय खांडगे (डिजिटल मार्केटिंग), निलया ग्रुपचे संस्थापक निलय मेहता, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, चंद्रशेखर ठाकूर, राजा आकाश आणि अल्बर्टो आयोरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, हिंदकेसरी विजेता विजय चौधरी, डॉ. हितेंद्र महाजन, प्रगतिशील शेतकरी-उद्योजक विलास शिंदे आदी नामवंत सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील अन्य तज्ज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे घेत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल. 

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी
समीटमध्ये सहभागी होण्याऱ्या इच्छुकांसाठी सकाळी ९.३० पर्यंत सपकाळ नॉलेज हब, अंजनेरे येथे नोंदणी करता येणार आहे. या समीटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी २०० रुपये, तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी ४०० रुपये शुल्क आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजनव्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT