corona vaccine sakal media
नाशिक

नाशिक : सव्वा लाख नागरिक धोकादायक स्थितीत; घेतला नाही दुसरा डोस

विक्रांत मते


नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची प्रशासनाने तयारी केली असताना आता दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा सातपटीने आक्रमण करणारा विषाणू आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एक लाख २३ हजार नागरिक असे आहेत की त्यांना पहिला डोस घेतला, परंतु कोव्हॅक्सिन किंवा कोव्हीशिल्ड घेण्यासाठी अनुक्रमे तीस व ८४ दिवसांची मुदत उलटूनही दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे पहिल्या डोसचा प्रभाव कमी होऊन कोरोनाच्या धोकादायक स्थितीत जाऊ नये म्हणून दुसरा डोस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात कोरोना पहिल्या लाटेने हैरान झालेल्या नाशिककरांना दुसऱ्या लाटेने पहिल्यापेक्षा मोठा तडाखा दिला. दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका भयानक होता की, प्रत्येक नागरिक चिंताग्रस्त बनला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले. २६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सर्वप्रथम कोरोनायोद्धे अर्थात कोरोना रुग्णांसाठी झटणाऱ्यांना डोस देण्यात आला. त्यानंतर साठ वयोगटापुढील नागरीकांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. एक मेपासून अठरा वयोगटापुढील सर्वच नागरिकांना सरसकट डोस देण्याचे धोरण अवलंबिले. परंतु, डोसचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ४५ वयोगटापुढील नागरिकांनाच डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. डोस उपलब्ध होत नव्हते, त्यावेळी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावत होते. नगरसेवकदेखील प्रचाराचा भाग म्हणून लसीकरण केंद्रे मागून घेत होते. परंतु, लसीकरण केंद्रावर तासाभरातच उपलब्ध होत असलेली लस संपत होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शासन व महापालिकेच्या यंत्रणेवर टीका होत होती. परंतु, दररोज लस उपलब्ध होवू लागली. या वेळी नागरिकांना लसीकरणाकडे पाठ फिरविली.

७२ हजार कुप्या शिल्लक

महापालिका हद्दीमध्ये १२९ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या कोव्हॅक्सिन व कोव्हीशिल्ड मिळून ७२ हजार कुप्या उपलब्ध आहेत. आतापर्यंत एक लाख २३ हजार नागरिक असे आहेत की ८४ दिवस उलटूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशा नागरिकांचा शोध घेतला जात आहे. संबंधित नागरिकांनी दुसरा डोस घेऊन सुरक्षित व्हावे, असे कळकळीचे आवाहन महापालिकेला करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT