Corona News Updates esakal
नाशिक

जिल्ह्यात 108 ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण; दिवसभरात 14 बाधित, 13 कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या वाढत असताना, कोरोनामुक्‍त रुग्‍णसंख्येतही वाढ होते आहे. बुधवारी (ता.१५) जिल्ह्यात चौदा रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (positive) आले. तर तेरा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात १०८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (108 active patients in district Nashik Cororna update news)

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील अकरा रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. तर मालेगाव महापालिका क्षेत्र एक व जिल्‍हा बाहेरील दोघांना कोरोनाची लागण झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ३६४ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ३०२ नाशिक ग्रामीण, ३९ नाशिक महापालिका क्षेत्र तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील २३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.०४ राहिला. यात नाशिक महापालिका क्षेत्राचा दर ३.४९ टक्‍के होता. सध्या सक्रिय असलेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील ८०, नाशिक ग्रामीणमधील पंधरा, मालेगावचे दोन तर जिल्‍हा बाहेरील अकरा बाधितांचा समावेश आहे.

ऑक्‍सिजनद्वारे एका बाधितावर उपचार

सध्याच्‍या १०८ ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांमध्ये ८७ रुग्‍णांमध्ये कुठल्‍याही स्वरूपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. २१ रुग्‍णांमध्ये कोरोनाविषयक लक्षणे आढळलेले आहेत. यापैकी एका रुग्‍णाला उपचारादरम्‍यान ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासते आहे. व्‍हेंटीलेटरवर सध्या कुठलाही रुग्‍ण नाही. दरम्‍यान जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयातदेखील एकही बाधित दाखल झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT