ssc hsc exam latest marathi news esakal
नाशिक

10वी, 12वी 17 नंबर फॉर्मची प्रक्रिया उद्यापासून; 24 ऑगस्‍टपर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे.

त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्‍यासाठीची प्रक्रिया शुक्रवार (ता.२९) पासून सुरु होत असून, २४ ऑगस्‍टपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. (10th 12th 17 number form processing from tomorrow Deadline till 24th August Nashik latest marathi news)

शिक्षण मंडळातर्फे सविस्‍तर वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्‍या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते आहे. शुक्रवार (ता.२९) पासून २४ ऑगस्‍टपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व निर्धारित शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मुदत असेल.

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबतची पावतीच्‍या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्‍या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी १ ते २६ ऑगस्‍ट अशी मुदत असणार आहे.

संपर्क केंद्र शाळा/महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी ३० ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीसाठी नाव नोंदणी ऑफलाईन अर्ज स्‍वीकारला जाणार नाही. http://form17.mh-ssc.ac.in किंवा http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्‍थळाच्‍या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्‍ध असेल.

या कागदपत्रांची आवश्‍यकता

अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांच्‍या स्‍कॅनकॉपी अपलोड करायच्या आहेत. त्‍यानुसार शाळा सोडल्‍याचा दाखला (मूळ प्रत), नसल्‍यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्‍वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो विद्यार्थ्यांनी स्‍वतःसोबत ठेवायचा आहे. ही कागदपत्रे ऑनलाइन अर्ज भरताना स्‍कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT