farmers sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना 120 कोटीची मदत

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७१ हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून पहिल्या टप्प्यात १२० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सर्वाधिक निधी मालेगावसाठी तर त्याखालोखाल येवल्याला या निधीचा लाभ होणार आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने सर्वत्र दाणादाण करत शेतीला पूर आणले, पिके पाण्याखाली जाऊन सडली. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून अवघ्या महिनाभरात पंचनाम्याची पूर्तता करून शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीच्या मदतीच्या दरात वाढ करून वाढीव निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम प्राप्त झाली असून अनुदान वितरीत करतांना बाधित गावांची अल्फाबेटिकली यादी तयार करून सुरुवातीस ज्या गावांना १०० टक्के अनुदान वितरित करणे शक्य आहे, त्यांना ते केले जाणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी रोज या वाटपाचे पर्यवेक्षण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल द्यायचा आहे. लाभार्थ्यांना मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व शेतकऱ्यांना बँकेच्या बचत खात्यातच मदतीची रक्कम मिळणार आहे. कोणालाही रोखीने किंवा निविष्ट स्वरूपात ही रक्कम मिळणार नाही. विशेष म्हणजे बँकेने देखील या रकमेतून कोणत्या प्रकारची वसुली करू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहे.

असा वाढला निधी

यापूर्वीच्या दराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११० कोटी रुपयांची मदत पहिल्या टप्प्यात होणार होती. मात्र मदतीचे दर वाढल्याने यात ९ कोटी ८२ लाखाची वाढ झाल्याने आता तब्बल १२० कोटी २४ लाख रुपयांची मदत पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना होणार आहे. शासनस्तरावरून उर्वरित २५ टक्के निधी देखील लवकरच उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळेल अशी अपेक्षा आहे.

असा वाटप होईल मदतनिधी..

मालेगाव - ४२ कोटी ६२ लाख २८ हजार

नांदगाव - ३३ कोटी ४९ लाख ७७ हजार

देवळा - २ लाख ६१ हजार

सुरगाणा - ९ लाख २४ हजार

त्र्यंबकेश्वर - १ लाख ६५ हजार

इगतपुरी - ५ लाख ५० हजार

पेठ - २७ लाख २७ हजार

निफाड - २ कोटी २१ लाख ७१ हजार

येवला - ४१ कोटी ४४ लाख

एकूण - १२० कोटी २४ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT