Corona Update News esakal
नाशिक

Corona Update : जिल्‍ह्‍यात 133 पॉझिटिव्‍ह, शहरातील एकाचा मृत्‍यू

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असताना जिल्‍हावासियांची चिंता काहीप्रमाणात वाढते आहे. शनिवारी (ता.१६) जिल्‍ह्‍यात १३३ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. १०३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली, नाशिक महापालिका क्षेत्रातील एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

यातून सक्रीय रुग्‍ संख्येत वाढ झालेली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ६६५ ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत. (133 positives in district one death in city Nashik Corona Update news)

शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ७५, नाशिक ग्रामीण भागातील ५३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक तर जिल्‍हा बाहेरील चौघांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले आहे. परंतु गेल्‍या पंधरा दिवसांत कोरोनाने तीन बाधितांचा मृत्‍यू झालेला असून, यापैकी एक ग्रामीण तर दोन मृत शहरी भागातील आहेत.

सध्या उपचार घेत असलेल्‍या बाधितांपैकी सर्वाधिक ३०८ बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील २९८, मालेगावच्‍या ३४, जिल्‍हा बाहेरील २५ बाधितांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर ३.७४ टक्‍के राहिला.

दरम्‍यान सायंकाळी उशीरापर्यंत ८४७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. सर्वाधिक ५९६ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण भागातील होते. नाशिक शहरातील ११३, मालेगावच्‍या १३८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT