corona update nashik  esakal
नाशिक

Corona Update : जिल्‍ह्यात 188 कोरोनामुक्‍त; 86 पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : बऱ्याच दिवसांनंतर जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या (Corona Patients) तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहिली.

सोमवारी (ता. १८) जिल्‍ह्यात ८६ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर १८८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १०२ ने घट झाली. सद्यःस्‍थितीत उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ६०७ झाली आहे. (188 corona free in district 86 positive nashik Corona Update latest marathi news)

गेल्‍या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्‍त रुग्‍णांपेक्षा अधिक राहत होती. यामुळे जिल्‍ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या सातशेपार पोचली होती. नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या शंभरीच्‍या जवळ असली, तरी सोमवारी मोठ्या प्रमाणावर रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली.

दिवसभरात ८६ पॉझिटिव्‍ह आढळले. यांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३४, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ४९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्ह्याबाहेरील दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. १८८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली.

सध्या उपचार घेत असलेल्‍या ६०७ कोरोनाबाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील २८९, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील २८४ बाधितांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात १९, जिल्‍ह्याबाहेरील १४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

सोमवारी जिल्‍ह्याचा पॉझिटिव्‍हिटी दर ५.१२ टक्‍के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्रासाठी ६.९४ टक्‍के, तर नाशिक ग्रामीणसाठी ४.१८ टक्‍के होता. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ६६ अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीणमधील ८०२, नाशिक शहरातील दीडशे, तर मालेगावच्‍या ११४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT