नाशिक

तुळशी विवाहानंतर सुरू होणार लग्न सराई

CD
यंदा शुद्ध विवाहमुहूर्त जानेवारीनंतरच सिंहस्थ गुरूचे कारण ः जूनअखेरपर्यत तब्बल ५७ विवाह तारखा ------------------ सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१५ ः विवाह हा अत्यंत पवित्र संस्कार मानला जातो. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित करताना पंचांगानुसार मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. यंदा तुळशी विवाह २१ नोव्हेंबरला असून समाप्ती २४ ला आहे. त्यानंतर लग्नसराईला सुरवात होणार असली तरी लग्नासाठी इच्छुकांना यंदा शुध्द विवाह मुहूर्तासाठी जानेवारीअखेरपर्यत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिंहस्थ गुरूमुळे २६ जानेवारी २७ पासून विवाह मुहूर्त सुरू होतील. जूनपर्यत हंगामात तब्बल ५७ शुद्ध मुहूर्त असल्याची माहिती पंचांगतज्ज्ञ शरद आहेर यांनी दिली. ------------- देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाहानंतर चातुर्मासाची समाप्ती होत असल्याने लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. यंदा २० नोव्हेंबरला देवउठनी एकादशी असून त्यानंतर विवाह, गृहप्रवेश या सारख्या कार्यांना सुरवात होणार आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी केवळ चार मुहूर्त उपलब्ध असल्याने लग्नाची तयारी करणाऱ्यांना तारखांचे नियोजन करावे लागणार आहे. पंचांगानुसार २० नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार अनुकूल ग्रहस्थिती आणि शुभनक्षत्रांच्या काळात विवाह झाल्यास वधू- वरांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती नांदते. त्याप्रमाणे विवाहाची वेळ निश्चित करताना वधूवरांच्या जन्मकुंडलीचे मिलन, मंगळदोष तसेच इतर ग्रहस्थितीचाही विचार केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार,अनुकुल ग्रहस्थिती आणि शुभ नक्षत्रांच्या काळात विवाह झाल्यास जीवनात सुख, शांती व र्स्थेर्य नांदते. त्याच प्रमाणे विवाहाची वेळ निश्चित करताना वधू- वरांच्या जन्मकुंडलीचे मीलन मंगळदोष तसेच इतर ग्रहस्थितीचाही विचार केला जातो. त्यामुळे लग्नाची तारीख ठरविताना कुटुंबीयांकडून पंचांग व ज्योतिष सल्ल्याला प्राधान्य दिले जाते असे पंचांगतज्ज्ञ शरद आहेर यांनी सांगितले. ------- लग्नाचे मुहूर्त असे नोव्हेंबर २०२६ ः २१,२४.२५,२६ जानेवारी २०२७ ः २६,२७,२९ फेब्रुवारी २०२७ ः २,३,१०,११,१२,१५,२१,२२,२४,२५,२७,२८ मार्च २०२७ ः १०,११,१४,२३,२४,२५,२७,२९,३१ एप्रिल २०२७ ः १,३,१६,१८,२१,२६,२८,२९,३०. मे २०२७ ः ९,१३,१४,१५,१७,१९,२०,२१,२२,२५,२६,३०,३१ जून २०२७ ः ११,१२,१५,१७,१९,२३,२४ -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT