Dada Bhuse news esakal
नाशिक

Nashik News : स्मशानभूमी शेडसाठी अवघे 24 लाख; सुविधांची वाणवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या गावांनी गुजरातला जोडण्याची मागणी झाल्यानंतर, तालुक्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला असता यात तब्बल १२० गावांमधील स्माशनभूमींना शेड नसल्याचे निर्दशनास आले होते.

त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीतून अतिरिक्त निधी देऊ असे सांगितले खरे. प्रत्यक्षात, मात्र, पुर्ननियोजनातून केवळ २३ स्माशनभूमींना शेड देण्यात आले आहेत. पुर्ननियोजनातून स्मशानभूमी शेड बांधण्याची जिल्ह्यात केवळ २४ कामे मंजूर केली असून त्यासाठी २४ लाख रुपये निधी वर्ग केला आहे. (24 lakhs only for cremation shed lack of facilities Nashik News)

राज्य सरकारच्या व जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधेच्या निधीमधून ग्रामपंचायतींना स्मशानभूमी बांधणे, स्मशानभूमी घाट बांधणे, दशक्रिया शेड उभारणे, स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत उभारणे आदी कामांसाठी निधी दिला जातो. या निधीच्या नियोजनाला पालकमंत्री मान्यता देतात.

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ८ तालुके हे आदिवासी बहुल आहेत. त्यात आदिवासी ग्रामपंचायतींमध्ये अनेक पाडे, वाड्या असून त्या गावांची लोकसंख्या कमी आहे. त्यांचे एकमेकांपासून अंतरही अधिक असते.

यामुळे जिल्ह्यातील १ हजार ३८५ ग्रामपंचायती व १ हजार ९०० गावांपैकी अद्यापही ४६१ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी शेड बांधलेले नसल्याचे समोर आले होते. यातही सुरगाणा तालुक्यातील गावांनी थेट गुजरातला जोडण्याची मागणी केली, त्यावेळी हा मुद्दा चांगलेच चर्चेत आला होता.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

पालकमंत्री भुसे यांनी सुरगाण्याचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे पुर्ननियोजन करताना सुरगाण्यातील कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ही अपेक्षा फोल ठरली असून सुरगाणा तालुक्यातील १२० गावांना स्मशानभूमी शेडची गरज असताना केवळ २३ गावांसाठी स्मशानभूमी शेड मंजूर केले आहेत. त्यासाठी केवळ २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त आणखी एक शेड मंजूर केले असून ते मालेगाव तालुक्यातील आहे.

नियोजन करताना कामांकडे दुर्लक्ष

गत पावसाळ्यातही भर पावसात अंत्यसंस्कार करण्याच्या घटना घडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला.

त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, प्रत्यक्षात नियोजन करताना या स्मशानभूमीच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा परिषदेला मागील वर्षी १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही. यामुळे ही कामे मागे पडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT