accident death news esakal
नाशिक

Nashik News : तुळजापूर- सोलापूर महामार्गावर अपघातात सिन्नर तालुक्यातील 3 भाविकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील भोजापुर खोरे चास येथील काही तरुण देवदर्शनासाठी गेले होते. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना ते ज्या वाहनातून जीपने जात होते, त्या गाडीचे टायर फुटून भरधाव जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्यामुळे या भीषण अपघातात चास येथील तिघेजण ठार झाले, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी सकाळी सहा तीस वाजता सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी नजीक घडली. (3 devotees from Sinnar taluka died in an accident on Tuljapur Solapur highway Nashik News)

या वाहनात सिन्नर तालुक्यातील चास येथील भाविक होते. मरण पावलेल्यांत निखिल रामदास सानप (24), अनिकेत बाबासाहेब भाबड ( 24 ), अर्थव शशीकांत खैरनार ( 26 ) यांचा समावेश आहे गंभीर जखमी झालेल्या भाविकांमध्ये तुषार दत्तात्रय बिडगर( 24) ( 27 ) दिपक बिडगर दोघे गंभीर जखमी तर किरकोळ जखमी पंकज खैरनार, गणेश खैरनार, जीवन ढाकणे, शंकर भाबड हे किरकोळ जखमी झाले आहेत.

सर्व जखमी सिन्नर तालुक्यातील चास रहिवासी आहेत. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सही भुरे पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून जखमींना सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सोमवारी हे आठ तरुण देवदर्शनासाठी सिन्नर तालुक्यातील चास गावातुन गेलेले होते अतिशय जीवभावाचे हे मित्र असल्याचे पंचक्रोशीत सांगण्यात येत आहे मंगळवारी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

देवदर्शनासाठी जात असताना सोलापूर तुळजापूर येथील महामार्गावरील तामकलवाडी परिसरात या भाविकांचे गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात तीन तरुणांच्या या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघाताचे वृत्त तालुक्यातील चास या गावात समजताच गावातील वातावरण शोकाकुल झाले होते. अतिशय जिवाभावाचे तीन मित्र हे अपघातात मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शांतता पसरली होती. अपघातातील जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT