Nashik Leopard News
Nashik Leopard News  esakal
नाशिक

Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणी ठार

विजय पगारे

Nashik Leopard News : इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील ही दुर्दैवी तरुणी आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (31 year old girl killed in leopard attack in igatpuri nashik news shm99)

मीनाक्षी शिवराम झुगरे (वय ३१) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही तरुणी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली.

यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ह्या भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.

दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्रिंगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे तसेच एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे.

दरम्यान वन विभागाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT