42-year-old man and minor boy physically abused a minor girl in sinnar taluka 42-year-old man and minor boy physically abused a minor girl in sinnar taluka
नाशिक

नाशिक पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलासह दोघांचा चिमुरडीवर बलात्कार

राजेंद्र अंकार

नाशिक : शहरात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या व सध्या पॅरोल वर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने सिडकोतील ब्युटी पार्लर मध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार घडला असतानाच सिन्नर तालुक्यात एका गावातील चिमुरडीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून ते २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत फिर्यादी व त्यांच्या पत्नी घरी नसताना आरोपी गणेश निवृत्ती कुंदे (वय ४२) रा. औंढेवाडी ता. सिन्नर याने फिर्यादी यांच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत राहत्या घरी व शेतात दोन-तीन वेळा बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. यानंतर औंढेवाडी येथीलएका अल्पवयीन आरोपीने देखील चिमुरडीच्या अज्ञानपणाचा फायदा घतिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी ४२ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलास अटक केली आहे.

या घटनेनंतर मुलीने सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून त्यास बालन्यायालयात हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT