corona-covid19.jpg
corona-covid19.jpg 
नाशिक

आनंदवार्ता! जिल्ह्या‍त नऊ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात...तर 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांपैकी आजारावर मात करत बऱ्या झालेल्‍या रुग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. मंगळवारी (ता. २८) दिवसभरात ४७३ रुग्‍ण कोरोनावर मात करत घरी परतले, तर नव्‍याने २०८ कोरोनाबाधित आढळून आले.

जिल्ह्या‍त पाच जणांचा कोरोनाने मृत्‍यू 

शहरातील तीन रुग्‍णांसह एकूण पाच रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. तपासणीदरम्‍यान एक हजार १३ संशयित रुग्‍णालयात दाखल झाले आहेत. शहरातील रुग्‍णांची संख्या आटोक्‍यात येतानाची स्‍थिती असताना ग्रामीण भागात मात्र रुग्‍णसंख्येत वाढ होत चालली आहे. दिवसभरात आढळलेल्‍या २०८ रुग्‍णांपैकी बहुतांश रुग्‍ण नाशिक ग्रामीणचे होते, तर मालेगाव महापालिका हद्द आणि जिल्हाबाह्यच्या प्रत्‍येकी एका रुग्‍णाचा यात समावेश आहे. बऱ्या झालेल्‍या ४७३ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २८८, नाशिक ग्रामीणचे १६७, मालेगावचे १५, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. धात्रक फाटा येथील ६५ वर्षीय पुरुष, सातपूरच्‍या निगळ गल्‍लीतील ७० वर्षीय महिला, काठे गल्‍ली परिसरातील ३४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. इगतपुरीतील ६२ वर्षीय पुरुष आणि दिंडोरीतील ६३ वर्षीय पुरुषाचाही उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. 

शहरातील ५३६ संशयितांचा समावेश

दिवसभरात रुग्‍णालयात दाखल एक हजार १३ संशयितांमध्ये नाशिक शहरातील ५३६ संशयितांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणचे २०२, मालेगाव महापालिका हद्दीतील २५, तर अडीचशे संशयितांना गृहविलगीकरणात पाठविले आहे. आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांपैकी नऊ हजार ७७१ रुगणांनी कोरोनावर मात केली असून, दोन हजार ४१४ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT