Leopard News
Leopard News esakal
नाशिक

Nashik News : नामपूरला बिबट्याच्या हल्ल्यात 5 जनावरे ठार; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : येथील सटाणा रस्त्यालगत असणाऱ्या सुधाकर सूर्यवंशी यांच्या शेतातील तीन बोकड, दोन शेळ्या अशा पाच जनावरांचा मंगळवारी (ता.२८) पहाटे तीनला बिबट्याने हल्ला एकाच वेळी फडशा पाडला. शेतशिवारात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पाळीव प्राण्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतात घर करून राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा बसवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. (5 animals killed in leopard attack in Nampur Nashik News)

सुधाकर सूर्यवंशी गेल्या अनेक वर्षांपासून सटाणा रस्त्यालगत असणाऱ्या आपल्या शेतात (गट क्रमांक १४५/४) घर करून राहतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्या, बोकड पाळले होते. बिबट्याच्या हल्ल्यात बोकड, शेळ्या ठार झाल्याने सुधाकर सूर्यवंशी यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहर व परिसरातील नागरिकांचा शेती मुख्य व्यवसाय असल्याने येथील अनेक शेतकरी शेतात घर करून राहतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्धपालन, गोट फार्म असे अनेक व्यवसाय सुरू केले आहे.

परंतु बिबट्याने पाळीव प्राण्यांना लक्ष्य केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यापूर्वीही बिबट्याने नामपूर बाजार समितीचे संचालक, प्रगतशील शेतकरी अविनाश सावंत यांच्या शेतातील सालदार यांची बकरी, बोळाई शिवारात प्रगतशील शेतकरी पंकज कापडणीस यांच्या सात बकऱ्या फस्त केल्या आहेत. मुरलीधर कापडणीस यांचीही बकरी फस्त केली आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीच्या कामाला मजूर मिळणे अवघड झाले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अनेकदा दर्शन

सटाणा रस्त्यालगत पहाटेच्या वेळी अनेक नागरिक, महिला, तरुण व्यायाम व फिरण्यासाठी जातात. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सटाणा रस्त्यालगतच्या मयूर फर्निचर मॉलसमोरील शेतांमध्ये वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

सटाणा येथील वनविभागाचे वनरक्षक भगवान गोयेकर, वन कर्मचारी योगेश अहिरे, प्रवीण धोंडगे यांनी बिबट्याचा वावर असणाऱ्या शेतशिवारास भेट देऊन पाहणी केली. त्यांना शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.

नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडणे, सुतळी बॉम्ब फोडणे, मोठ्या आवाजात गाणे वाजवणे असा सल्ला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतात राहणाऱ्या नागरिकांना दिला आहे.

"बिबटय़ाने यापूर्वी अनेकदा परिसरातील गावांमधील पाळीव जनावरे, पाळीव कुत्री फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्याने दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक भयभीत आहेत. वनविभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. वनविभागाने तातडीने पिंजरा बसवावा."

- सुधाकर सूर्यवंशी, शेतकरी नामपू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT