Pension Court
Pension Court esakal
नाशिक

Nashik : पेन्शन अदालतमध्ये 55 प्रकरणे निकाली

कुणाल संत

नाशिक : जिल्हा कोशागार कार्यालयामार्फत (District Treasury Office) राज्य सेवा निवृत्ती वेतनधारकांसाठी (State service retirees) गुरुवारी (ता.१६) आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतमध्ये (pension court) ५५ प्रकरणे ही निकाली काढण्यात आली. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पेन्शन संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींवर मार्गदर्शन केले. (55 cases settled in pension court Nashik News)

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये पेन्शन अदालत आणि पेन्शन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लेखा व कोशागार संचालक वैभव राजेघाटगे, प्रादेशिक सहसंचालक नीलेश राजूरकर, उपमहालेखापाल आशुतोष द्विवेदी, वरिष्ठ कोशागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, वरिष्ठ लेखा अधिकारी सैंड्रा पॅरिस, सहाय्यक लेखा अधिकारी भारती खदुरीया, वरिष्ठ लेखापाल संतोष केदारे, मंगेश जाधव आदी उपस्थित होते. सदर पेन्शन अदालतमध्ये ११३ निवृत्ती वेतनधारकांनी लेखी निवेदने व अर्ज सादर केले होते. त्यापैकी ५५ प्रकरणी अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करत ती प्रकरणे निकाली काढली.

महालेखापाल यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या, परंतु वैधता संपलेले ४० उपदान प्रदान आदेश पुनर्विधीग्राह्य करून देण्यात आले. उर्वरित प्रकरणी महालेखापाल यांच्याकडून नियमोचित कार्यवाही प्राधान्याने केली जाणार आहे. यावेळी ऑनलाइन अंशराशीकरणाच्या संदर्भातील अडचणी दूर करून देण्यात आल्या. पेन्शन अदालतसाठी सुमारे ३०५ सेवानिवृत्ती वेतनधारक उपस्थित होते.

याप्रसंगी राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्ती वेतनधारकांचे विविध प्रश्न, समस्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वैभव राजेघाटगे आणि आशुतोष द्विवेदी यांनी निवृत्तिवेतन धारकांचे सर्व शंकांचे निरसन करत त्यांना महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतनधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या साप्ताहिक ऑनलाइन पेन्शन संवाद, २४ तास टोल फ्री क्रमांक, १८००२२००१४ : २४ तास व्हॉइस मेल क्रमांक ०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र, जीपीएफ सेवापत्र आणि निवृत्तीवेतनधारकांकरीता ई-मेल helpdesk.mh1.ac@cag.gov.in उपक्रमांची विस्तृत माहिती देण्यात आली. या वेळी राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह उत्तमराव गांगुर्डे, रवींद्र थेटे, मधुकर कांगणे, सुभाष कंकरेज, पूजा पवार, मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Heat Wave: शरीरामधील उष्णतेत होते वाढ; जडतात मूळव्याध, ॲसिडिटीसारखे आजार

SCROLL FOR NEXT