corona 
नाशिक

महिन्‍याची सुरवात दिलासादायक! जिल्‍ह्यात दिवसभरात ५७ बाधित

अरूण मलाणी

नाशिक : कोरोनाच्‍या (Coronavirus) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने ऑगस्‍ट महिन्‍याची सुरवात दिलासादायक झालेली आहे. काल (ता.१) जिल्‍ह्यात ८३ पॉझिटिव्‍ह आढळलेले असतांना, सोमवारी (ता.२) जिल्‍ह्यात ५७ कोरोना बाधित आढळले. तर दिवसभरात ८० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. तीन बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ८० बाधितांवर उपचार सुरु आहे.

ऑगस्‍ट महिन्‍याची सुरवात दिलासादायक

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील २६, नाशिक ग्रामीणमधील तीस रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍ह्याबाहेरील एकाला कोरोनाची लागण झालेली असतांना, मालेगाव महापालिका क्षेत्रात एकही बाधित आढळून आला नाही. जिल्‍ह्यातील तीन बळींमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक व नाशिक ग्रामीण क्षेत्रातील दोघांचा समावेश आहे. सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ३८४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक ग्रामीणमधील ९५५, मालेगाव २३२ तर नाशिक महापालिका क्षेत्रातील १९७ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात (home quarantine) ३५७ रुग्‍ण आढळले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३१५ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ३१ रुग्‍णांचा समावेश होता.

(57-corona-positive-80-corona-free-in-Nashik-district-update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT