61st marathi haushi Rajya Natya Spardha Presentation of Rebound and Final Draft  esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: अखेरच्या दिवशी ‘रिबाऊंड’ आणि ‘फायनल ड्राफ्ट’चे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्पर्धक, परीक्षक, समन्वयक अन् नाट्य रसिक प्रेक्षक अशा सर्वच घटकांच्या काही कुरबुरी, काही वाहवा आणि बऱ्याच अंशी समाधानाचे वातावरण अशा स्थितीत ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा मंगळवारी (ता. २०) समारोप झाला. अत्यंत चुरस म्हणता येणार नाही, परंतु सहभागी संघांची वाढलेली संख्या पाहता निकालाची उत्सुकता निश्‍चितच वाढली आहे. (61st marathi haushi Rajya Natya Spardha Presentation of Rebound and Final Draft on last day nashik news)

दरम्यान, समारोपापूर्वी दिवसभरात दोन नाटकं सादर झाली. या दोन्ही नाटकांनाही अपेक्षेप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ‘स्पर्धेचा शेवट गोड झाला’ अशीच भावना नाट्यगृहाच्या परिसरात व्यक्त होत होती. सुरवातीची दोन नाटके रद्द झाल्याने आणि मध्यंतराला सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या नियोजित कार्यक्रमांमुळे स्पर्धेत काही काळ खंड पडला होता.

त्यामुळे लांबलेल्या या स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला. तत्पूर्वी, सकाळी साडेअकराला ए. आर. के. प्रॉडक्शन ॲक्टिंग इन्स्टिट्यूटतर्फे लेखक व दिग्दर्शक अभिजित कार्सेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘रिबाऊंड’ हे नाटक सादर केले. एखाद्याने दुसऱ्यासाठी खड्डा खोदला, तर त्यात कधी ना कधी तो स्वतःच पडणार असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या स्तरावर ‘रिबाऊंड’ करण्याची सवय जोपासली पाहिजे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्याचा चांगला प्रयत्न बघावयास मिळाला. अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजनेसह अन्य तांत्रिक बाजूंच्या दृष्टीनेही सादरीकरण उल्लेखनीय होते. तरीही, सर्वच कलाकार हौशी असल्याने सादरीकरणात मात्र काही उणिवा जाणवल्या. समारोपाच्या सत्रात सायंकाळी पंचवटीतील अंबिका चौक सेवाभावी संस्थेने एका अनामिक नात्याचा शोध घेणारे ‘फायनल ड्राफ्ट’ हे नाटक सादर केले. गिरीश जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन राजेश शर्मा यांनी केले. जाणकार नाट्य रसिक असलेले राजा पाटेकर यांनी निर्मिती सूत्रधाराची बाजू सांभाळली.

अवघ्या दोनच पात्रांच्या भोवती फिरणारे या नाटकाचे कथानक मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास समर्थ होते. त्यामुळे सादरीकरणातील सुटसुटीतपणा, टायमिंग, नेटके नेपथ्य आणि अन्य तांत्रिक बाजूही भक्कम होत्या. त्यामुळे हे नाटक स्पर्धेत टिकेल असे म्हणावयास वाव आहे. किंबहुना त्यामुळेच स्पर्धेतील अखेरचे नाटक संपल्यानंतर एक अनामिक हुरहूर नाट्य रसिकांनी अनुभवली. अशा पार्श्‍वभूमीवर आता नाशिक केंद्रावर सादर झालेल्या प्राथमिक फेरीच्या निकालाची उत्कंठा वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT