Idol of Kalika Mata found in a cave esakal
नाशिक

Nashik News : चांदवडच्या पूर्वेकडील डोंगरावर नवव्या शतकातील जैन लेणी; लेणीत जैन तीर्थंकरांसह कालिका माता मूर्ती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील चांदवड गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर नवव्या शतकातील गुहा असून, लेणीत जैन तीर्थंकर यांच्यासह गणपती आणि कालिका मातेची मूर्ती आहे. जैन धर्माचे मूळनायक १००८ श्री चंद्रप्रभ भगवान, आदिनाथ भगवान, पार्श्‍वनाथ भगवान यांच्या अनेक मूर्ती लेणीत आहेत.

गावातील एका मंदिरात मूळनायकाच्या रूपात भगवान आदिनाथ मंदिराच्या शिलालेखावरून ही मूर्ती विक्रम संवत १२९२ मध्ये फाल्गुन शुल्क १२ ला बसविण्यात आल्याचे दिसते. हा परिसर मांगीतुंगी आणि गजपंथाच्या जवळ आहे. ( 9th century Jain cave on hill east of Chandwad nashik news)

नाशिकच्या आजूबाजूला त्रिंगलवाडी, अंजनेरी, पांडवलेणी तथा त्रिरश्‍मी लेणी, गजपंथ, चांदवड, मांगीतुंगी, कन्हेरगड-पाटणा, अंकाई-टंकाई गुंफा, नंदुरबारजवळील तीर्थंकर गुहा आणि इतर अनेक लेणी पाहावयास मिळतात.

इतिहासानुसार चांदवड हे एकेकाळी खानदेश ते नाशिकला जोडणारे व्यापाराचे केंद्र होते. एलोरा, अंजनेरी अथवा गजपंथ येथून मांगी-तुंगी आणि खानदेशात जाणाऱ्‍या जैन धर्मप्रसारकांना शांततापूर्ण निवारा देण्यासाठी चांदवडच्या जैन लेण्यांची निर्मिती केली गेली आहे. या लेणींमध्ये नंतर तीर्थंकर आणि इतर जैन मूर्ती कोरल्या आहेत.

इथला किल्ला सुना (यादव) वंशाचा राजा द्रधप्रहर यांनी बांधला होता. त्यांचे वंशज द्वारका आणि मथुरेशी संबंधित होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. द्रधप्रहारचा काळ इसवी सन ८६० च्या सुमारास होता, जेव्हा प्रतिहार-राष्ट्रकूट राजांच्या युद्धात या राजाने प्रजेचे रक्षण केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डोंगरातील गुहेत सापडलेल्या जैन तीर्थंकरांच्या मूर्त्या

त्यामुळे लोक राजाला कर भरू लागले आणि राज्याला समृद्धी मिळाली. हा राजा जैन धर्माचा अनुयायी होता आणि भगवान चंद्रप्रभांचा भक्त होता. म्हणून त्यांनी त्या ठिकाणाला चंद्रादित्यपूर असे नाव दिल्याचे सांगितले जाते. चांदवड, वसई आणि अस्वीच्या शिलालेखांमध्ये या राजाचा उल्लेख आढळतो.

२६०० वर्षे पुरातन लेणी

गुहेत काही तीर्थंकर आणि यक्षाच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात. त्यांची उंची दोन ते चार फूट आहे. शहरातील जैन मंदिरात भगवान ऋषभनाथांना समर्पित केलेल्या प्रतिमेवर एक शिलालेख आहे. चंद्रप्रभू भगवान हे गुहेचे मूळनायक असून, खडगासनात मूर्ती आहेत. गुहेत सहा मूर्ती कोरल्या आहेत. या लेणी चतुर्थकाल (जैन दिनदर्शिकेत) म्हणजेच २६००-२७०० वर्षांपूर्वी बनल्या असल्याचे जैन अभ्यासक सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT