crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : ग्रामीणमध्ये 321 अवैध धंद्यांवर कारवाई; 370 संशयितांविरोधात गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या २३ दिवसांमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम राबवून ३२१ गुन्हे दाखल करीत ३७० संशयितांविरोधात कारवाई केली आहे, तर एक कोटी ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी द्यावी, यासाठी ६२६२२५६३६३ ही हेल्पलाइन सुरू केली असून, त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Action against 321 illegal businesses in rural areas Cases registered against 370 suspects Nashik Latest Crime News)

नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीणचा पदभार स्वीकारताच, अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याप्रमाणे गेल्या २३ दिवसांमध्ये दारूबंदी, जुगार, अवैध वाळू, अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत ग्रामीण पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यावसायिकांविरोधात एकूण ३२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ३७० संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलिसांनी एक कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागरिकांसाठी हेल्पलाइन

जिल्ह्यातील अवैध धंद्यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ६२६२२५६३६३ यावर नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती कळवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक उमाप यांनी केले आहे.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

अशी केली कारवाई

अवैध धंदे.............दाखल केसेस.............संशयितांवर कारवाई .........जप्त मुद्देमाल

* दारूबंदी .................२६४ ................ २७०............ २२,१४,४७४

* जुगार ..........५०............८७........१२,०७,७९९

* एनडीपीएस ........०१........०२........ ३,८०,०००

* अवैध गुटखाविक्री ......०२ .........०२........६७,९९४

* अवैध बायोडिझेल ......०१......... ०५..........१,०१,६८,२४८

* अवैध वाळूउपसा..... ०१...........०१...........४,०९,०००

* अवैध अग्निशस्त्र बाळगणे .....०१.......०२.......७१०००

* हॉटल/ढाबा कारवाई ..... ०१.... ०१...........---

एकूण : ....... ३२१.......... ३७० ........१,४५,१८,५१५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT