Renukamata from Madhli Holi
Renukamata from Madhli Holi esakal
नाशिक

आदिमाया- आदिशक्‍ती : मधली होळी येथील रेणुकामाता

सकाळ वृत्तसेवा

चन्द्रमुखी इष्‍ट दात्री इष्‍ट मंत्र स्‍वरूपणीम् ।

धनदात्री आनंददात्री चंन्द्रघण्टे प्रणमाम्यहम् ।।

मधली होळी, जुने नाशिक येथील रेणुकामाता मंदिर ३०० वर्षांपूर्वीपासूनचे आहे. मंदिरात रेणुकामाता, भगवान परशुराम, अंबा- अंबिका व अंबालिका यांचे स्‍वयंभू तांदळे आहेत. २०१५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. (Adimaya Adishakti Navratri 2022 Renukamata of Madhali Holi Nashik Latest Marathi News)

मंदिराची आख्यायिका

दामोदरशास्‍त्री गर्गे वेदशास्‍त्रसंपन्न ब्राह्मण होते. प्रतिवर्षी आश्विन वद्य प्रतिपदा म्‍हणजेच घटस्‍थापनेपासून श्रीक्षेत्र माहूर येथे पूजापाठ करून घटी बसत. कोजागरी पोर्णिमेपर्यंत माहूर येथे वास्‍तव्य करत. कालांतराने वृद्धत्वामुळे माहूर येथे जाणे जमेना; त्‍यात त्‍यांना अर्धांगवायूने ग्रासले म्‍हणून घरातच पडून राहून त्‍यांनी देवीला आळवणी केली. तिला विनविले. ‘हे माते, आता इथून पुढे तुझ्यापर्यंत पोचणे शक्‍य नाही.

इतकी वर्षे माहूरला येऊन तुझी सेवा केली. ती तू स्‍वीकारलीस. आता एकच इच्छा आहे, की तू माझ्या घरी वास्‍तव्यास ये म्‍हणजे तुझी सेवा निरंतर मला करता येईल. काय आश्चर्य भक्‍ताच्या आर्त हकेने देवीने त्‍यांना दर्शन दिले. सोबत भगवान परशुराम, अंबा-अंबिका, अंबालिका या सर्वांना बरोबर घेऊन सर्व देवतांचे तांदळे भूमीतून प्रकट झाले. ही घटना सुमारे ३०० वर्षांपूर्वीची. मधली होळी येथील बुधा हलवाईजवळील वाड्यात हे अतिपुरातन रेणुका मंदिर आहे.

नवरात्रात तेजस जोशी यांच्याकडून दैनंदिन देवीचे पाठ केले जातात. सध्याचे मंदिराचे पुजारी कमलाकर जोशी यांच्या आईच्या मामांचे वडील दामोदरशास्‍त्री यांच्यानंतर मामा मनोहर गर्गे यांच्यानंतर भाचे लक्ष्मण जोशी आणि आता त्‍यांचे पूत्र कमलाकर जोशी यांच्याकडून रेणुकामातेची पूजा केली जात आहे.

"आईकडून देवीची आख्यायिका ऐकताना अगदी माहूर येथील रेणुकामाता साक्षात आपल्‍या वाड्यात वास्‍तव्यास आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. देवीची पूजापाठ करतानाचा आनंद व समाधान उच्चप्रतीचे आहे." - कमलाकर जोशी, देवीचे पुजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT