Aditi Tatkare esakal
नाशिक

Sakal Impact : जिल्ह्यातील कुपोषणासाठी स्वतंत्र बैठक घेणार; अदिती तटकरे यांच्याकडून दखल

‘सकाळ’ ने जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३८ टक्यांनी कुपोषण वाढले असल्याचे वृत्त १६ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : जिल्ह्यातील वाढत्या कुपोषणावर राज्यपाल रमेश बैस यांनी गत महिन्यात चिंता व्यक्त केली होती. त्यावर ‘सकाळ’ ने जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३८ टक्यांनी कुपोषण वाढले असल्याचे वृत्त १६ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, जिल्ह्यातील कुपोषणावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.(Aditi Tatkare will hold separate meeting for malnutrition in district nashik news)

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे गुरुवारी (ता.४) विविध कार्यक्रमानिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव २०२३-२४ चे उद्घघाटन झाले.

त्यावेळी कुपोषणाचा विळखा वाढता वाढता वाढे! या शीर्षकाखाली वर्षभरात कुपोषित बालकांत ३८ टक्के वाढ, ऑक्टोंबर अखेर कुपोषित बालकांची संख्या पोचली अडीच हजारांवर या आशयाचे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल मंत्री तटकरे यांनी यावेळी घेतली. तसेच कुपोषणाबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती देखील घेतली.

कुपोषणाची काय परिस्थिती आहे, आदिवासी तालुक्यात किती बालके आहे, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर, मंत्री तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, जिल्ह्यातील कुपोषणावर विचारणा केली. त्यावर मंत्री तटकरे यांनी जिल्ह्यातील कुपोषणाबाबत माहिती घेतली आहे.

या वाढत्या कुपोषणावर जिल्ह्यात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘सकाळ’ च्या याच वृत्तावर गत आठवड्यातच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील दखल घेतली होती. याबाबत, त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेत माहिती घेतली. तसेच कुपोषणाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत, कुपोषण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: भाषांपासून अंतराळ केंद्रापर्यंत! पुण्यातील सरकारी शाळेतील मुलांची नासामध्ये निवड; विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय

Maharashtra: आता लहान मासे पकडले तर थेट कारवाई! माशांच्या पुनरुत्पादनासाठी महायुती सरकारचा ‘गेम चेंजर’ निर्णय

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

Latest Marathi News Live Update: नाशिक जिल्हा परिषदेच्या 74 गटांची सोडत प्रक्रिया संपन्न

Dhule Crime : धुळ्यात १.५९ कोटींचे अवैध परराज्यातील मद्य जप्त! निजामपूरजवळ उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT