liquor seized
liquor seized esakal
नाशिक

देवळ्यातील ठेका हॉटेलमधून देशी- विदेशी मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि. नाशिक) : देवळा- नाशिक रस्त्यावरील रामेश्‍वर फाट्याजवळ असणाऱ्या ठेका हॉटेल येथून ६ हजार ६९० देशी- विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. नाशिक ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार- कांगणे यांच्या पथकाने कारवाई केली असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार- कांगने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध गुटखा, मद्य व अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पथकाने देवळा (Deola) येथील हॉटेल ठेका येथे कारवाई केली. सोमवारी (ता. २१) देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवळा- सोग्रस रोडवरील ठेका हॉटेल येथे बेकायदेशीर चोरट्या रीतीने देशी- विदेशी दारूची साठवणूक करून विक्री करताना शाम अशोक गावंडे (वय २४, रा. ठेका हॉटेल, रामेश्‍वर फाटा, ता. देवळा, जि. नाशिक (Nashik)) याच्या ताब्यात एकूण ६ हजार ६९० रुपये किमतीचा अवैध दारुसाठा मिळून आला. त्यानुसार त्याच्यावर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, कुणाल वैष्णव यांनी सदर कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT