नाशिक

जातीय क्रिकेट स्पर्धा

CD
ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट स्पर्धा --- आज समारोप; एकूण १२ संघांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१५ : येथील जी. एस. मैदानावर ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट दिवसरात्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद् घाटन नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर, लखन नेतले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, मोहन चव्हाण, संजय मोती, प्रदीप नेतलेकर, योगेश बागडे, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. नेतलेकर म्हणाले की, क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो एकजुटीचा संदेश देणारा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू कितीही चांगला असला, तरी संपूर्ण संघाची साथ मिळाल्याशिवाय विजय मिळविता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे समाजातही एखादी व्यक्ती मोठी होऊन उपयोग नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रगती करणे गरजेचे आहे. समाजातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, समाजबांधवांत एकोपा, बंधुभाव व संघटन भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे कार्तिक बाटुंगे यांनी सांगितले. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व अहमदाबाद येथील एकूण १२ संघ सहभागी आहेत. सोमवारी(ता.१६) अंतिम सामने होणार आहेत. गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर भाईराजा ग्रुप नरडाणातर्फे रोख एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येतील. राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे, गोविंद दहियेकर यांच्यासह युवक सहकार्य करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akwan: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती; ‘अक्वान’मुळे मुसळधार पावसाचा इशारा

Pune Nashik Highway: चंदनापुरी घाटात आठ वाहनांचा अपघात ;महामार्गावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Ahilyanagar News: कारची सायकलला धडक; दोन मुलांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जुहू चौपाटीवर छटपूजेची जय्यत तयारी; समुद्रकिनाऱ्यावरील पूजेवरून राजकीय वाद कायम

Anna Hazare : नशामुक्त भारत अभियान तळागाळात पोहोचविण्याबाबत अण्णा हजारे आणि सुमित सिंह यांच्यात राळेगण सिद्धीत सखोल चर्चा

SCROLL FOR NEXT