grapes sent.jpg 
नाशिक

आपणही 'त्यांचे' काही देणं लागतो...म्हणून 'ते' दरवर्षी आनंदवन अन्‌ हेमलकसासाठी करता द्राक्ष रवाना...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (कसबे सुकेणे) बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांसाठी चंद्रपूर येथे सुरू केलेले आनंदवन व सोमनाथ, डॉ. प्रकाश आमटे यांनी स्थापन केलेले गडचिरोली येथील माडिया गोंड या आदिवासींसाठी स्थापन केले हेमलकसा आदी ठिकाणी निफाड व दिंडोरी तालुक्‍यातून यंदा सात ते आठ क्विंटल द्राक्ष रवाना झाली आहेत.

द्राक्षही कधी पाहिलेली नव्हती

2013-14 या वर्षापासून निफाड व दिंडोरी तालुक्‍यांतून दर वर्षी द्राक्ष याठिकाणी पाठवले जातात. सुरवातीला 50 द्राक्षपेट्या पाठवली जाणारी द्राक्षे आज सात ते आठ क्विंटलपर्यंत जाऊन पोचली आहेत. आनंदवन व सोमनाथ येथे कुष्ठरुग्ण, अंध व अपंग आश्रयास आहेत. तर हेमलकसा येथील माडिया गोंड ही आदिवासी जमात तर खूपच मागासलेली आहे. त्यांनी द्राक्षही कधी पाहिलेली नव्हती. अगदी सुरवातीला मौजे सुकेणे येथील सचिन टिपले यांनी 2013-14 मध्ये प्रथमच आनंदवनाला भेट दिली व आपणही या लोकांचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी कसबे सुकेणे येथील आपले मित्र छगन जाधव, बाळासाहेब जाधव, महेश मोगल, शरद जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणली.

एकत्रित केलेली सर्व द्राक्षे होता रवाना

पुढील वर्षापासून या सर्वांनी द्राक्षाचे संकलन करून स्वखर्चाने ही द्राक्षे रेल्वेमधून त्याठिकाणी पोहचवली. त्यानंतर या युवकांनी निफाड तालुक्‍यातील साकोरे मिग येथील बोरस्ते, दिंडोरीमधील तीसगाव येथील भालेराव, बोपेगाव येथील कावळे, सोनजांब येथील जाधव, जवळके येथील पाटील या आपल्या मित्रांनाही या प्रवाहात सहभागी करून घेतले. या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी जोडणे व आता तर दर वर्षीच ही द्राक्षे पाठवली जातीत. त्यासाठी आनंदवन येथील सेवाभावी संस्थेचे वाहन याठिकाणी बोलवले जाते. ही एकत्रित केलेली सर्व द्राक्षे या वाहनांतून तेथे पोहचवली जातात. 

मागासलेल्या व पीडित समाजासाठी आपणही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून द्राक्ष संकलनाची योजना सुरू केली. पन्नास द्राक्ष पेट्यांपासून सुरू झालेली योजना आज आठ क्विंटलपर्यंत पोहचली आहे. अर्थात, याकामी अनेक द्राक्षउत्पादक शेतकरी मित्रांचे सहकार्य लाभले आहे. भविष्यातही अधिकाधिक मित्र जोडून द्राक्षांचा पुरवठा केला जाईल. - छगन जाधव, कसबे सुकेणे  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT