NCp party esakal
नाशिक

Nashik NCP News: राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अनिता दामले

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गटाच्या) नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असून महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी अनिता दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. (Anita Damle as NCP Women City President Nashik political News)

राष्ट्रवादी अंतर्गत फूट पडल्यानंतर शहराध्यक्ष योगिता आहेर व जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे या अजित पवार गटात सामील झाल्या. पक्षांतर्गत फूट पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून संघटना बांधणीचे काम सुरू आहे.

यात महिला आघाडीची दोन्ही महत्त्वाचे पदे रिक्त होती. त्यामुळे या रिक्त जागी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नियुक्त्या केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा तसेच महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन वाढवण्यासाठी पदाधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यात महिला आघाडीच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात झाली आहे.

या निवडीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी नगरसेवक गजानन शेलार, गोकूळ पिंगळे, रतन चावला यांनी स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT