banana esakal
नाशिक

केळी निर्यातीसाठी अपेडातर्फे ‘बनाना नेट’ होणार कार्यान्वित

महेंद्र महाजन

नाशिक : फलोत्पादन क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उत्पादनाला निर्यातीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अपेडातर्फे ऑनलाइन नोंदणीसह प्रमाणपत्र अन्‌ रासायनिक औषधांच्या उर्वरित अंशाच्या प्रमाणावरील नियंत्रणाची प्रणाली आठ उत्पादनांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. हीच सुविधा राज्यातील केळी उत्पादकांसाठी ‘बनाना नेट’ या नावाने सुरू होणार आहे. (Apeda-launch-Banana-Net-for-banana-exports-nashik-marathi-news)

यंदा महाराष्ट्रातून ४५५ कोटी केळींची निर्यात

देशातून एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ६१६ कोटींच्या एक लाख ९१ हजार टन केळीची निर्यात झाली. त्यात महाराष्ट्रातील ४५५ कोटींच्या एक लाख ३५ हजार टन केळींचा समावेश आहे. केळीची निर्यात प्रामुख्याने अरब राष्ट्रांसोबत इराण, इराक, दुबई, नेपाळ, बांगलादेशमध्ये होत आहे. त्याच्यापुढे जाऊन युरोपच्या बाजारपेठेत राज्यातील केळी पोचाव्यात म्हणून ‘बनाना नेट’ प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील निर्यात कक्षाचे प्रमुख गोविंद हांडे यांनी ‘सकाळ’ला दिली. ते म्हणाले, की ही प्रणाली कृषिदिनाच्या निमित्ताने १ जुलैपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने प्रयत्न आहे. प्रणालीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रणालीतून गुणवत्तापूर्ण केळी

प्रणालीमध्ये केळी उत्पादकांना आपल्या क्षेत्राची ऑनलाइन नोंदणी करता येईल. नोंदणी केल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल. त्याचबरोबर केळीच्या गुणवत्तावाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. त्यातून उर्वरित अंशाचे प्रमाण कमी राहावा, असा प्रयत्न राहील. या प्रणालीतून गुणवत्तापूर्ण केळी असा विश्‍वास ग्राहकांमध्ये तयार होईल. त्यातून निर्यातीच्या जोडीला देशांतर्गत बाजारपेठेत केळीला आणखी चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असेही हांडे यांनी सांगितले.

व्यापारी वळाले मराठवाड्यात

केळीची निर्यात करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव, कोल्हापूर, सोलापूरचा समावेश आहे. आताच्या पावसात केळीचे जळगावमध्ये नुकसान झाल्याने केळीच्या खरेदीसाठी व्यापारी नांदेड, परभणी भागात गेल्याची माहिती कृषी आयुक्तालयापर्यंत पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT