NSK26H34907
नंदुरबार : डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी चर्चा करताना मंत्री अशोक उईके. समवेत आमदार राजेश पाडवी, डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित.
---
मंत्री अशोक उईकेंनी घेतली
विजयकुमार गावितांची भेट
नंदुरबार, ता. १३ : आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
खटवाणी येथे वाडीधाम (गुजरात) प्रेरित श्री भाथीजी महाराज यांचा ५७ वा प्रगट जन्मजयंती महोत्सवानिमित्त मंत्री अशोक उईके नंदुरबार जिल्ह्यात आले होते. यादरम्यान, त्यांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेतली. या वेळी माजी खासदार डॉ. हीना गावित, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी त्यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान आमदार डॉ. गावित यांच्याकडून मंत्री उईके यांनी स्थानिक प्रश्न, तसेच अन्य माहिती जाणून घेतली. निधीअभावी आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामाबाबत डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हीना गावित यांनी मंत्री उईके यांच्याशी चर्चा केली. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार राजेश पाडवी आणि स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.