file photo
file photo esakal
नाशिक

NMC News : पाण्याच्या अचूक मापनासाठी ऑटोमॅटिक वॉटर रीडिंग मीटर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : व्यावसायिक कारणासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना ऑटोमॅटिक मोबाईल रीडिंगच्या माध्यमातून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात साडेसात हजार ग्राहकांना, तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास साडेअठरा हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे. (Automatic water reading meter for accurate water measurement NMC News)

नाशिक महापालिका हद्दीमध्ये २५ हजार १३४ व्यावसायिक नळजोडणीधारक आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने प्रत्येक ठिकाणी देयके पोचविणे अशक्य आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे शंभर टक्के वसुली होत नाही.

त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून व्यावसायिक ठिकाणी केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी मिशनअंतर्गत ऑटोमॅटिक मोबाईल रीडिंग तंत्राच्या साह्याने देयकांचे वाटप केले जाणार आहे.

ग्राहकांना ऑटोमॅटिक मोबाईल रीडिंगच्या तंत्राच्या साह्याने मोबाईलवर बिल देण्याबरोबरच मॅन्युअल मीटर रीडिंग पद्धती बंद करणे, तसेच मीटर रीडिंग मधील विसंगती कमी करण्याचा उद्देश आहे, अशी माहिती स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

साडेसात हजार मीटर बसविणार

गावठाण भागात प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात ७४४७ स्मार्ट वॉटर मीटर बसविले जाणार आहे. व्यावसायिक नळजोडणीच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक प्रो- मीटर बसविले जाईल.

इलेक्ट्रॉनिक मीटरच्या माध्यमातून पाणी वापराचे अचूक वाचन होऊन, त्या भागात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल ॲपवर मीटरची रीडिंग स्वयंचलित पद्धतीने नोंदविले जाईल. या माध्यमातून मनुष्यबळ व वेळेची बचत होईल पाण्याच्या अचूक वापराचीदेखील नोंद होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT